Kingdom Censor Review : आला रे आला राऊडी हिरो आला… ‘किंगडम’ बोले तो एकदम कडक
विजय देवरकोंडाच्या 'किंगडम' चित्रपटाचे सेन्सॉर रिव्ह्यू अतिशय सकारात्मक आहेत. जेलमधील विजयाचे अभिनय आणि भावनिक दृश्ये प्रभावी आहेत. भाग्यश्री बोरसेसोबतची केमिस्ट्रीही चर्चेचा विषय आहे. अॅक्शन, हिरोइझम आणि कुटुंबीय नाट्य यांचे उत्तम मिश्रण या चित्रपटाला वेगळेपण देते.

‘पेल्ली चूपुलु’, ‘अर्जुन रेड्डी’, ‘टॅक्सीवाला’, ‘गीता गोविंदम’सारख्या चित्रपटांमुळे तेलुगू चित्रपटसृष्टीमध्ये टॉप हिरो म्हणून नाव कमावलेला विजय देवरकोंडा मधल्या काळात सुपर फ्लॉप ठरला होता. त्यामुळे एक दमदार कमबॅक देण्यासाठी ‘जर्सी’ फेम गौतम तिन्ननुरीच्या दिग्दर्शनात त्याने ‘किंगडम’ नावाचा एक सशक्त चित्रपट केला आहे. हा चित्रपट 31 जुलै रोजी जगभरात पॅन इंडिया स्तरावर प्रदर्शित होणार आहे. हिंदीतही हा चित्रपट ‘साम्राज्य’ या नावाने प्रदर्शित होतो आहे.
विजयने याआधी कधीही न केलेल्या एका नव्या प्रकारात (जॉनर) हा सिनेमा तयार करण्यात आला आहे. ट्रेलर प्रदर्शित होण्याआधीच चित्रपटाबद्दल चांगली उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटात विजय टक्कल लूकमध्ये दिसतो. जेलच्या सीनमधील त्याचा अभिनय पाहून अंगारवर शहारे आल्याशिवाय राहत नाही, असे सेन्सॉर टॉक सांगते. भावाभावाचा भावनिक संबंध, नातेसंबंध यावर आधारित सीन खूप प्रभावी असल्याचेही सांगितले जात आहे. अभिनेत्री भाग्यश्री बोरसेसोबत विजयची केमिस्ट्रीदेखील एक हायलाइट ठरणार आहे, असेही सेन्सॉर मंडळाच्या चर्चेतून समजते.
अॅक्शन, हिरोइझम आणि कौटुंबिक ड्रामा अशा सगळ्या घटकांचा समतोल साधत एक पॉवरफुल स्क्रिप्ट दिग्दर्शक गौतम तिन्ननुरीने पडद्यावर उभी केली आहे. ‘जर्सी’प्रमाणेच या चित्रपटातही त्याने मानवी भावना अधोरेखित केल्या आहेत, अशी चर्चा आहे. अनिरुद्ध रविचंदरचे संगीत आधीच हायप वाढवत असून, सिनेमॅटोग्राफी विभागात जोमोन टी. जॉन आणि गिरीश गंगाधरन यांनी मिळून व्हिज्युअल्स एका नव्या उंचीवर नेले आहेत. तर एडिटिंगसाठी नॅशनल अवॉर्ड विजेता नवीन नूळी यांनी जबाबदारी घेतली असून, हे देखील चित्रपटासाठी एक प्लस पॉईंट ठरत आहे.
The gun is loaded And The rage is real 🔥
BLAZING ALL GUNS with a U/A Certificate 💥💥
Let the rampage begin with the #KingdomTrailer today 🌋 #Kingdom #KingdomOnJuly31st @TheDeverakonda @anirudhofficial @gowtam19 @ActorSatyaDev #BhagyashriBorse @dopjomon #GirishGangadharan… pic.twitter.com/qTLheP8qMY
— Sithara Entertainments (@SitharaEnts) July 26, 2025
सितारा एंटरटेन्मेंट्स आणि फॉर्च्यून फोर सिनेमाजच्या बॅनरखाली सूर्यदेवरा नागवंशी आणि साई सौजन्य यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. श्रीकर स्टुडिओजच्या सादरीकरणात बनलेला हा भव्य चित्रपट ट्रेलर रिलीजनंतर प्रेक्षकांमध्ये आणखी अपेक्षा वाढवणार हे निश्चित!
