“..तेव्हा मी मुलीसोबत घर सोडलं होतं,” संजय कपूर यांच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा

या सीरिजमध्ये अभिनेते संजय कपूर (Sanjay Kapoor) यांची पत्नी महीप कपूर (Maheep Kapoor) यांनी त्यांच्या खासगी आयुष्याविषयी मोठा खुलासा केला. लग्नाच्या सुरुवातीच्या काळात संजय यांनी फसवणूक केल्याचं महीप यांनी सांगितलं.

..तेव्हा मी मुलीसोबत घर सोडलं होतं, संजय कपूर यांच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा
संजय कपूर यांच्या पत्नीचा धक्कादायक खुलासाImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 02, 2022 | 5:35 PM

नेटफ्लिक्सवरील ‘फॅब्युलस लाइव्स ऑफ बॉलिवूड वाइव्स’ (Fabulous Lives of Bollywood Wives) ही वेब सीरिज सध्या चांगलीच चर्चेत आहे. या सीरिजमध्ये अभिनेते संजय कपूर (Sanjay Kapoor) यांची पत्नी महीप कपूर (Maheep Kapoor) यांनी त्यांच्या खासगी आयुष्याविषयी मोठा खुलासा केला. लग्नाच्या सुरुवातीच्या काळात संजय यांनी फसवणूक केल्याचं महीप यांनी सांगितलं. त्या घटनेनंतर मुलगी शनायाला घेऊन त्या घराबाहेर पडल्या होत्या. महीप आणि संजय यांच्या लग्नाला आता 25 वर्षांचा काळ झाला आहे. या दोघांना शनाया ही मुलगी आणि जहान हा मुलगा आहे. ‘फॅब्युलस लाइव्स ऑफ बॉलिवूड वाइव्स’मध्ये निलम कोठारी सोनी, महीप कपूर, सीमा खान आणि भावना पांडे या चौघी झळकल्या. आपल्या खासगी आयुष्याविषयी बरेच खुलासे या चौघींनी शोमध्ये केले आहेत.

सीमा खानशी बोलत असताना महीप म्हणाल्या, “माझ्या लग्नाच्या सुरुवातीच्या काळात संजयने नात्यात माझी फसवणूक केली. तेव्हा मी शनायाला घेऊन बाहेर पडले. मी स्वत:साठी तो निर्णय घेतला होता. पण माझ्या हातात नुकतीच जन्मलेली मुलगी होती. एक महिला म्हणून आणि एक आई म्हणून मी मुलीला प्राधान्य दिलं. माझ्या मुलीला वडिलांचं प्रेम मिळावं ही भावना मनात होती. जर मी त्यावेळी हे नातं मोडलं असतं तर मी आयुष्यभर पश्चात्ताप केला असता. कारण आता जेव्हा माझी मुलं माझ्या घरी येतात, माझा पती जेव्हा घरात येतो, तेव्हा त्यांच्यासाठी ती जागा सर्वांत सुंदर असते. ती शांतता अनुभवणं त्यांची गरज आहे आणि तीच शांतता संजय मलाही देतो.”

हे सुद्धा वाचा

“कोणत्याही परिस्थितीत माझा संसार मोडू नये हाच माझा प्रयत्न होता आणि स्वार्थी बनत मी माझ्यासाठी आणि मुलांसाठी ती भूमिका घेतली. यात कोणतीही तडजोड नव्हती. हे सर्व माझ्यासाठी होतं”, असं महीप कॅमेरासमोर बोलताना म्हणाल्या. जेव्हा सीमा यांनी महीप यांना विचारलं की फसवणुकीसाठी त्यांनी संजय यांना माफ केलं का, तेव्हा त्या पुढे म्हणाल्या, “100 वर्षांपूर्वी जे घडलं ते घडलं. त्यातून पुढे आल्याचं मला समाधान आहे. वैवाहिक आयुष्य हे विविध रंगांनी भरलेलं असतं. जोपर्यंत माफीचा प्रश्न येतो, तर आम्ही दोघांनी एकमेकांना आयुष्याच्या विविध टप्प्यांवर माफ केलंय. त्याने अनेकदा माझ्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला. पण या प्रवासात आम्ही एकत्र पुढे आलो.”

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.