Miss world 2017 : मानुषी छिल्लर ‘या’ चित्रपटात विकी कौशलसोबत करणार रोमान्स!

'मिस वर्ल्ड' मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) लवकरच यशराज बॅनरखाली तयार झालेल्या पृथ्वीराज चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:59 PM, 1 Mar 2021
Miss world 2017  : मानुषी छिल्लर 'या' चित्रपटात विकी कौशलसोबत करणार रोमान्स!

मुंबई : ‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) लवकरच यशराज बॅनरखाली तयार झालेल्या पृथ्वीराज चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. पृथ्वीराज चित्रपटात ती अक्षय कुमारसोबत दिसणार आहे. मात्र, आता एक नवीन बातमी अशी आहे की, मानुषी विकी कौशलसोबत (Vicky Kaushal) ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ या चित्रपटात दिसणार आहे. (Manushi Chhillar will have a romance with Vicky Kaushal in ‘The Great Indian Family’)

विशेष म्हणजे या चित्रपटात मानुषी विकीसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. विकीचा हा पहिलाच विनोदी चित्रपट आहे. या चित्रपटात एक थोडा वेगळा परिवार दाखवण्यात येणार आहे आणि म्हणूनच या चित्रपटाचं नाव ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ असे असणार आहे अशी चर्चा रंगत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन विजय कृष्ण आचार्य हे करणार आहेत. मात्र, हा चित्रपट या वर्षी प्रदर्शित होणार नाही असे सांगितले जाणार आहे.

यामुळे विकीच्या चाहत्यांना थोडी वाट बघावी लागणार आहे. विकी शशांक खैतान यांच्या ‘मिस्टर लेले’ या चित्रपटात काम करणार आहे. त्यानंतर लगेच तो आदित्य धार यांचा ‘अश्वत्थामा’ हा चित्रपट करणार आहे. विकीने ‘सरदार उधम सिंग’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करून घेतले आहे. मात्र, तो चित्रपट अद्यापही प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहे. मानुषी सध्या अक्षय कुमारसोबत ‘पृथ्वीराज’ या चित्रपटात काम करत आहे.

याच चित्रपटातून मानुषी बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार आहे. विकी कौशल आणि कतरिना कैफचे नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मात्र, या दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल कोणतेही भाष्य केले नाही. दोघेही पार्टी आणि प्रोग्राममध्येसोबत असतात एवढेच नव्हे तर या दोघांनीसोबतच नवीन वर्ष देखील साजरे केले, ज्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

संबंधित बातम्या : 

जावेद अख्तर मानहानी प्रकरणात कंगना विरोधात वॉरंट जारी , जाणून घ्या संपूर्ण प्रकरण…

‘सालार’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला, पाहा कोण कोण झळकणार ‘या’ चित्रपटात…

पुन्हा एकदा आई झाल्यानंतर करीनाने शेअर केला पहिला फोटो, पाहा कॅप्शनमध्ये काय लिहिलंय…

(Manushi Chhillar will have a romance with Vicky Kaushal in ‘The Great Indian Family’)