AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज कुंद्राच्या जामिनाची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली, न्यायालयीन कोठडीविरोधात दाखल केला होता अर्ज!

न्यायालयीन कोठडीच्या निर्णयाला राज कुंद्राने मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. या प्रकरणाची आज (2 ऑगस्ट) मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली, त्यानंतर न्यायमूर्ती गडकरी यांनी राज कुंद्राच्या जामीन अर्जाची सुनावणी 7 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे.

राज कुंद्राच्या जामिनाची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली, न्यायालयीन कोठडीविरोधात दाखल केला होता अर्ज!
राज कुंद्रा
| Edited By: | Updated on: Aug 02, 2021 | 1:44 PM
Share

मुंबई : अश्लील चित्रपट बनवण्याच्या आणि विकण्याच्या प्रकरणात राज कुंद्राला (Raj Kundra) न्यायालयीन कोठडीतून सुटका मिळेल, असे काही वाटत नाही. न्यायालयीन कोठडीच्या निर्णयाला राज कुंद्राने मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. या प्रकरणाची आज (2 ऑगस्ट) मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली, त्यानंतर न्यायमूर्ती गडकरी यांनी राज कुंद्राच्या जामीन अर्जाची सुनावणी 7 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 ऑगस्ट रोजी होणार आहे.

राज कुंद्राच्या अटकेबाबत न्यायालयात सरकारी वकील अरुणा पै यांनी एका पाठोपाठ अनेक युक्तिवाद दिले. या युक्तिवादांमध्ये त्यांनी न्यायालयाला सांगितले की,  ‘हॉटशॉट आणि बॉलीफेम या अॅप्सवर आक्षेपार्ह मजकूर तयार आणि स्ट्रीम केल्याबद्दल मुंबई गुन्हे शाखेला राज कुंद्रा आणि त्याच्या साथीदारांविरोधात पुरावे भक्कम मिळाले आहेत. तो या प्रकरणाशी संबंधित आहे.’

अरुणा पै यांनी न्यायालयात केलेल्या युक्तिवादातील मुख्य मुद्दे :

  1. अरुणा पै म्हणाल्या, ‘जेव्हा उमेश कामतने राज कुंद्रा आणि रायन थोर्पे यांच्या विरोधात काही तथ्य उघड केली, तेव्हा तपास सुरू झाला. रायन थोर्पे हा राज कुंद्राच्या कंपनीचा आयटी प्रमुख आहे.’
  2. आम्ही राज कुंद्राचे ऑफिस तपाले. त्या वेळी थोर्पे देखील तेथे उपस्थित होते. तिथे अनेक गोष्टी सापडल्या. सुरुवातीला 41A ची नोटीस देण्यात आली होती, जी राज कुंद्रा यांनी स्वीकारली नाही. परंतु, थोर्पे यांनी ती स्वीकारली. अरुणा पै यांनी पुढे न्यायालयाला सांगितले की, राज कुंद्रा यांना नोटीसवर स्वाक्षरी करण्यास सांगितले होते, परंतु त्यांनी नकार दिला आणि सहकार्य केले नाही.
  3. राजच्या कार्यालयातून अनेक आक्षेपार्ह साहित्य सापडले. नोटीस बजावल्यानंतर त्यांना अटक करायची आहे की, नाही हे जाणून घ्यायचे होते.
  4. राज कुंद्रा आणि रायन थोर्पे यांच्या अटकेचे कारण स्पष्ट करताना अरुणा पै म्हणाल्या की, ही अटक करण्यात आली आहे कारण या लोकांनी व्हॉट्सअॅप ग्रुपवरील मेसेज डिलीट करण्यास सुरुवात केली होती. ते पुरावे नष्ट करत होते. हे सर्व आता काढले गेले आहे की, नाही हे आम्हाला माहित नाही. सध्या तपास सुरू आहे. पोलीस ते पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
  5. रायन थोर्पेच्या रिमांड अर्जात, त्याला स्पष्टीकरण देण्यात आले आहे की, त्याला आधीच नोटीस बजावण्यात आली होती. त्याने राज कुंद्राचे मेहुणे प्रदीप बक्षी यांच्या मालकीची केनरीन कंपनी हॉटशॉटची प्रशासक असल्याचे न्यायालयाला सांगितले. रिमांड अर्जात जे सांगितले आहे, ते केस डायरी आणि स्टेशन डायरीमध्ये लिहिले आहे. यानंतर अरुणा पै यांनी न्यायालयासमोर दंडाधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केलेली केस डायरी आणि स्टेशन डायरी सादर केली. त्यांना अटक करण्यात आली कारण, ते पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत होते किंवा त्यांनी काही पुरावे नष्ट केले, असे त्या म्हणाल्या.
  6. कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे जबाब कलम 164 अंतर्गत नोंदवले गेले आहे. कार्यालयात सापडलेल्या लॅपटॉपमधून हार्ड डिस्क जप्त करण्यात आली, ज्यात 68 अश्लील व्हिडीओ होते. यासह, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन देखील प्राप्त झाले, ज्यामध्ये हॉटशॉट अॅपचा तपशील सापडला. या PPT मध्ये आम्हाला बाजार धोरण आणि आर्थिक अंदाज सापडले. राज कुंद्राच्या लॅपटॉपमध्ये अश्लील सामग्री असलेली फिल्म स्क्रिप्ट सापडली. कुंद्राच्या लॅपटॉपमधून, आम्ही वापरकर्त्याच्या फाइल्स, ईमेल, फेस टाइम, लॉग, कॉन्टॅक्ट्स, इंटरनेट ब्राउझिंग पुनर्प्राप्त केले, जिथे आम्हाला केनरीनसह विविध व्यवहार आणि पावत्या सापडल्या.

(Raj Kundra’s bail hearing adjourned till 7th august application filed against judicial custody)

हेही वाचा :

अभिनेत्री झोयाचा दावा – राज कुंद्राच्या हॉटशॉट्स अ‍ॅपसाठी न्यूड ऑडिशनची मागणी, सिंगापूरहून आला होता फोन

Nandita Dutta Case: कोलकाता पॉर्न रॅकेट प्रकरणात आणखी एका फोटोग्राफर अटक, नव्या मॉडेल्सचे अश्लील व्हिडीओ बनवल्याचा आरोप

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.