TikTok बंद झाल्याने रितेश देशमुखला मोठा आर्थिक फटका, अभिनेता म्हणतोय ‘बेरोजगार झाल्यासारखं वाटतंय…’

अभिनेता रितेश देशमुखचे इन्स्टाग्रामवर प्रचंड चाहते आहेत. विशेषतः त्याच्या मजेदार रील्समुळे चाहते आनंदी होतात, जे तो अनेकदा इन्स्टाग्रामवर शेअर करतो. जेव्हा भारतामध्ये टिक टॉकचा ट्रेंड होता, तेव्हा रितेश अनेकदा त्यावर आपले व्हिडीओ शेअर करत असायचा.

TikTok बंद झाल्याने रितेश देशमुखला मोठा आर्थिक फटका, अभिनेता म्हणतोय ‘बेरोजगार झाल्यासारखं वाटतंय...’
Riteish Deshmukh

मुंबई : अभिनेता रितेश देशमुखचे इन्स्टाग्रामवर प्रचंड चाहते आहेत. विशेषतः त्याच्या मजेदार रील्समुळे चाहते आनंदी होतात, जे तो अनेकदा इन्स्टाग्रामवर शेअर करतो. जेव्हा भारतामध्ये टिक टॉकचा ट्रेंड होता, तेव्हा रितेश अनेकदा त्यावर आपले व्हिडीओ शेअर करत असायचा. टिकटॉक बंद झाल्यानंतर रितेश देशमुखला वाटते आहे की, तो बेरोजगार झाला आहे. त्याने स्वतः एका मुलाखतीदरम्यान याचा खुलासा केला.

एका ऑनलाइन पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत रितेश देशमुखने लॉकडाऊन दरम्यान टिक टॉकसाठी कसे लहान व्हिडीओ बनवायला सुरुवात केली, याचा खुलासा केला, ज्यामुळे प्रत्येकाचा मूड हलका झाला. अभिनेता म्हणाला की, त्याच्या या व्हिडीओंची सुरुवात लॉकडाऊन दरम्यान झाली होती आणि हा तो काळ होता, जेव्हा प्रत्येकजण कठीण काळातून जात होता. मग, आम्हाला वाटले आपण त्यांना हसण्याचे काहीसे निमित्त देऊ…

टिकटॉक बंद झाल्यानंतर रितेश बेरोजगार झाला?

यानंतर, रितेशने अत्यंत मजेदार पद्धतीने सांगितले की, जेव्हा टिक टॉकवर बंदी घालण्यात आली तेव्हा त्याला वाटले की, तो बेरोजगार झाला आहे. रितेश म्हणाला की, मला वाटले की अरे देवा, मी आता काय करावे? जे काम तिथे होते ते तर गेले. मग इन्स्टा रील आले. मी म्हणालो चला, रील आले बरं झालं. हे बोलल्यानंतर रितेश स्वतः जोरात हसायला लागला. तथापि, हे देखील खरं आहे की, रितेश स्वतः टिकटॉक वरून पैसे कमवत होता आणि ते बंद झाल्यानंतर, त्यातून कमाईवर नक्कीच परिणाम झाला असेल.

चाहत्यांना आवडतात व्हिडीओ

रितेश, त्याची पत्नी आणि अभिनेत्री जेनेलियासोबत टिक टॉकवर बरेच व्हिडीओ बनवत असे. जेव्हा भारतात टिकटॉकवर बंदी घालण्यात आली, तेव्हा त्याने इन्स्टाग्रामवर रील बनवायला सुरुवात केली. जेनेलिया आणि रितेशचे व्हिडीओ त्यांच्या चाहत्यांना खूप आवडतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

अभिनेत्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, रितेश आदित्य सरपोतदारच्या आगामी ‘काकुडा’ या चित्रपटात दिसणार आहे. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे, ज्यात रितेश व्यतिरिक्त सोनाक्षी सिन्हा आणि साकिब सलीम देखील महत्त्वाच्या भूमिकेत असतील. याशिवाय, रितेश जेनेलियासोबत ‘लेडीज व्हर्सेस जेंटलमन’ हा शोही करत आहे. या शोचा हा दुसरा सीझन आहे.

हेही वाचा :

बॉलिवूडच्या ‘अंतिम’ निर्णयामुळे होतेय मराठी चित्रपटांची गळचेपी? ‘जयंती’ चित्रपटाचे प्रदर्शन वेळेआधीच!

‘होम मिनिस्टर’ची मानाची पैठणी देऊन आदेश बांदेकर भावोजींनी केला कतरीनाचा सन्मान! पाहा फोटो…

Aila Re Aillaa Song : अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’चे पहिले गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, पहा धमाकेदार टीझर…

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI