Aila Re Aillaa Song : अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’चे पहिले गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, पहा धमाकेदार टीझर…

अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री कतरिना कैफ अभिनीत आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सूर्यवंशी' चित्रपटाची प्रेक्षक बऱ्याच काळापासून वाट पाहत आहेत. मात्र, त्यांची प्रतीक्षा 5 नोव्हेंबरला संपेल, जेव्हा 'सूर्यवंशी' चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. तथापि, निर्माते चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी प्रेक्षकांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीत.

Aila Re Aillaa Song : अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’चे पहिले गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, पहा धमाकेदार टीझर...
Aaila Re aailaa

मुंबई : अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री कतरिना कैफ अभिनीत आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’ चित्रपटाची प्रेक्षक बऱ्याच काळापासून वाट पाहत आहेत. मात्र, त्यांची प्रतीक्षा 5 नोव्हेंबरला संपेल, जेव्हा ‘सूर्यवंशी’ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. तथापि, निर्माते चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी प्रेक्षकांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीत. म्हणूनच आज (20 सप्टेंबर) म्हणजेच बुधवारी चित्रपटाच्या पहिल्या गाण्याचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. या गाण्याचे बोल आहेत – ‘आयला रे आयला…’

अक्षय कुमारने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘आयला रे आयला’ या गाण्याचा टीझर शेअर केला आहे. या छोट्याशा टीझरमध्ये अक्षय कुमार, अजय देवगण आणि रणवीर सिंह यांची जबरदस्त झलक पाहायला मिळाली आहे. पोलिसांच्या गणवेशात दिसणारे हे तीन कलाकार या गाण्यात अतिशय आक्रमक मूडमध्ये दिसले आहेत. आपल्या इंस्टाग्रामवर हा टीझर पोस्ट करत अक्षय कुमारने लिहिले की, ‘सूर्यवंशीसोबत या दिवाळीला सिनेमा गृहाकडे परत या. चित्रपट 5 नोव्हेंबर रोजी रिलीज होत आहे. येथे एक टीझर पाहा. ‘आयला रे आयला’ हे गाणे उद्या प्रदर्शित होणार आहे.’

पाहा पोस्ट :

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

या चित्रपटात कतरिना कैफही धमाकेदार अॅक्शन करताना दिसणार आहे. याशिवाय रोहित शेट्टीने या सुपरकॉप सीरीजच्या नवीन भागाच्या प्रमोशनसाठी अनेक गोष्टींची योजना आखली आहे. तो त्याच्या या बिग बजेट चित्रपटाचे मोठ्या स्तरावर प्रमोशन करण्यात व्यस्त आहे.

ऑनलाइन मीडिया रिपोर्टनुसार, रोहित शेट्टी आपल्या चित्रपटांसाठी नवीन मार्केटिंग मोहिमा तयार करण्यासाठी ओळखला जातो. सूर्यवंशीसाठी, सुपरस्टार दिग्दर्शक रोहित शेट्टीने फक्त 15 ते 18 दिवसांची एक छोटी आणि दमदार मोहीम करण्याचे ठरवले आहे, जी या गाण्यांनी प्रेरित असेल. दिग्दर्शकाकडे दुसरा ट्रेलर देखील तयार आहे, तथापि, तो ते लाँच करणार नाही कारण यामुळे चित्रपटाच्या मुख्य भागाबद्दल बरीच माहिती उघड होईल, असे म्हटले जात आहे.

आणखी दोन गाणी येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

असे सांगितले जात आहे की, चित्रपटाचे प्रमोशन करताना रोहित शेट्टीने चित्रपटाच्या रिलीजपूर्वी तीन गाणी रिलीज करण्याची योजना आखली आहे. यातील एक गाणे ‘आयला रे आयला’ उद्या म्हणजेच गुरुवारी रिलीज होत आहे. उर्वरित दोन देखील चित्रपट रिलीज होण्यापूर्वी प्रदर्शित केले जाऊ शकतात. सध्या, अक्षय कुमारचे चाहते उद्या रिलीज होणाऱ्या गाण्याचा टीझर पाहून त्याचा पूर्ण व्हिडीओ रिलीज होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा स्फोटक टीझर प्रेक्षकांना खूप आवडत आहे. टीझर जितका दणकेदार आहे, तितकाच गाणेही तितकेच धमाकेदार असेल अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा :

Aryan Khan Drugs Case | पाण्यात बुडवून खावं लागतंय बिस्कीट, 100 कैद्यांच्या गर्दीत झोपण्याचा प्रयत्न करतोय आर्यन खान!

‘Sardar Udham’ची मेहनत दाखवताना विकी कौशलने शेअर केला पाठीवरच्या वळांचा फोटो, चाहतेही झाले स्तब्ध!

Katrina Kaif : ‘सूर्यवंशी’च्या प्रमोशनसाठी कतरिना कैफचा ग्लॅमरस अवतार, पाहा खास फोटो

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI