Kareena Kapoor-Khan | जेव्हा गर्भवती करीना सेटवरच बेशुद्ध पडते! ‘प्रेग्नन्सी बायबल’मध्ये सांगितला किस्सा…

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री करीना कपूर-खान (Kareena Kapoor-Khan) हीने नुकतेच तिचे नवीन पुस्तक लाँच केले आहे. अभिनेत्रीच्या या पुस्तकाचे नाव ‘प्रेग्नन्सी बायबल’ असे आहे. या पुस्तकात करीना कपूर खानने तिच्या प्रेग्नन्सीचे अनुभव तिच्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

Kareena Kapoor-Khan | जेव्हा गर्भवती करीना सेटवरच बेशुद्ध पडते! ‘प्रेग्नन्सी बायबल’मध्ये सांगितला किस्सा...
करीना कपूर-खान

मुंबई : बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री करीना कपूर-खान (Kareena Kapoor-Khan) हीने नुकतेच तिचे नवीन पुस्तक लाँच केले आहे. अभिनेत्रीच्या या पुस्तकाचे नाव ‘प्रेग्नन्सी बायबल’ असे आहे. या पुस्तकात करीना कपूर खानने तिच्या प्रेग्नन्सीचे अनुभव तिच्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. फेब्रुवारी महिन्यात अभिनेत्रीने तिचा दुसरा मुलगा जेह याला जन्म दिला. या पुस्तकात अभिनेत्रीने तिच्या गरोदरपणाचे काही अनुभव सांगितले आहेत. ज्यामध्ये तिने एकदा सेटवर बेशुद्ध झाल्याचे सांगितले आहे. अगदी गरोदरपणातही अभिनेत्री तिच्या चित्रपटाचे सातत्याने शूटिंग करत होती, जिथे तिच्यासोबत ही घटना घडली.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार अभिनेत्रीने आपल्या पुस्तकात असे लिहिले आहे की, लोकांना वाटते की एखाद्या अभिनेत्रीचे जीवन ग्लॅमरने भरलेले असते. पण, अभिनेत्री असे म्हणते की, अशी कोणतीही गोष्ट नाही. या पुस्तकात, अभिनेत्रीने असे लिहिले आहे की, तिने गरोदरपणाने आपला लूक ग्लॅमारस दाखवण्याचा प्रयत्न केला, पण तिला त्याचा काही फायदा झाला नाही. अभिनेत्रीने सांगितले आहे की, गर्भधारणेदरम्यान तिचे वजनही बरेच वाढले होते. तिला बरेच प्रेग्नन्सी स्पॉट्स देखील आले होते. ती दररोज संध्याकाळी पाच वाजता झोपी जात असे. पण एक दिवस अचानक एका फोटोशूटदरम्यान ती सेटवर बेशुद्ध झाली.

पुस्तकात शेअर केला जेहचा फोटो!

या सर्व गोष्टी कोणाबरोबरही कधी शेअर करणार नाही, असा विचार तिने कधी केलाच नाही, असे अभिनेत्रीने सांगितले आहे. ज्यामुळे तिने या नवीन पुस्तकात तिच्या गरोदरपणात तिच्याबरोबर घडलेल्या प्रत्येक गोष्टीचा उल्लेख केला आहे. त्याचवेळी अभिनेत्रीने सांगितले आहे की, जेहच्या जन्मापूर्वी तिने काही महिने कठोर परिश्रम केले. अलीकडेच करीना आणि सैफच्या दुसर्‍या मुलाचे नाव समोर आले आहे. करीनाने जेहचे कोणताही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेला नाही. पण या पुस्तकात तिने एक फोटो शेअर केला आहे, जो आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

करीना कपूर खानविरोधात तक्रार दाखल

अभिनेत्रीच्या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर तिच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. अभिनेत्रीच्या या पुस्तकाचे नाव ‘प्रेग्नन्सी बायबल’ असे आहे. ज्यामुळे ख्रिश्चन धर्मियांचा रोष पेटला आहे. अल्फा ओमेगा ख्रिश्चन फेडरेशनचे अध्यक्ष आशिष शिंदे यांनी या पुस्तकासंदर्भात शिवाजी नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणात पुढे काय होईल, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

(When pregnant Kareena falls unconscious on the set The story told in the Pregnancy Bible)

हेही वाचा :

अमिताभ बच्चनपेक्षाही अधिक मानधन घेणारे प्राण जेव्हा बॉबीसाठी 1 रुपया आकारतात, वाचा किस्सा…

Khoya Khoya Chand | रातोरात सुपरस्टार बनलेली ‘तुम बिन’ची संदली सिन्हा, पाहा आता काय करतेय…

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI