AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जन्मताच 775 कोटींची मालक बनली ही चिमुकली, वडिलांपेक्षा आईकडे दुप्पट संपत्ती

Deepika Padukone and Ranveer Singh Net Worth: दीपिका पदुकोणची गणना बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रीमध्ये होते. दीपिका चित्रपटांव्यतिरिक्त अनेक ब्रँड्सच्या जाहिराती करते. तसेच अनेक स्टार्टअपमध्ये गुंतवणूक तिने केली आहे. रिपोर्ट्सनुसार दीपिकाची एका महिन्याची कमाई तीन कोटींपेक्षा जास्त आहे.

जन्मताच 775 कोटींची मालक बनली ही चिमुकली, वडिलांपेक्षा आईकडे दुप्पट संपत्ती
Deepika Padukone and Ranveer Singh baby
| Updated on: Sep 09, 2024 | 10:56 AM
Share

बॉलीवूडमधील स्टार कलाकार दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह यांच्या घरात नन्ही परी आली आहे. दोघे त्या परीचे आई-बाप बनले आहे. दीपिकाने शनिवारी मुलीला जन्म दिला. मुंबईतील एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये शनिवारी दीपिकाने कन्यारत्नास जन्म दिला. त्यापूर्वी दीपिकाने परिवारासह 6 सप्टेंबर रोजी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले होते. आता दीपिका आणि रणवीर आई-बाबा बनले. या पॉवरफूल कपलकडे कोट्यवधींची नेटवर्थ आहे. अनेक लग्झरी फ्लॅट्स, आलीशान बंगले आणि गाड्या आहेत. आता त्यांची नन्ही परी या संपत्तीची उत्तराधिकारी बनली आहे.

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह बॉलीवूडमधील टॉप स्टार्स आहे. त्यांनी चित्रपट, जाहिरातीमधून कोट्यवधींची संपत्ती जमवली आहे. कमाईच्या बाबतीत हे कपल एकमेकांना जोरदार टक्कर देत आहे. त्या दोघांची मिळून ज्वाइंट नेटवर्थ 745 कोटी रुपये आहे.

रणवीरकडे किती आहे संपत्ती?

14 वर्षांपूर्वी असिस्टेंड डायरेक्टर म्हणून रणवीरने बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवले. त्यानंतर रणवीरने एकामागे एक सुपरहिट चित्रपट दिले आहे. चित्रपटात येण्यापूर्वी कटेंट रायटर म्हणून रणवीरने काम केले. त्यावेळी पगार हजारो रुपयांमध्येच होता. परंतु आता एका चित्रपटासाठी कोट्यावधीचे मानधन ते घेतात. आपल्या युनिक स्टाइल आणि फॅशनमुळे रणवीर चर्चेत राहिला. तो जाहिरातीमधून चांगला पैसा कमवतो. त्याच्याजवळ पेप्सी, चिंग्स, मान्यवर, बिंगो या सारख्या ब्रँड आहे. फायनान्शिअल एक्सप्रेसनुसार, रणवीर कपूरची एकूण संपत्ती 245 कोटी रुपये आहे.

दीपिकाकडे किती आहे संपत्ती?

दीपिका पदुकोणची गणना बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रीमध्ये होते. दीपिका चित्रपटांव्यतिरिक्त अनेक ब्रँड्सच्या जाहिराती करते. तसेच अनेक स्टार्टअपमध्ये गुंतवणूक तिने केली आहे. रिपोर्ट्सनुसार दीपिकाची एका महिन्याची कमाई तीन कोटींपेक्षा जास्त आहे. दीपिका एका एंडोर्समेंटसाठी 8 कोटी रुपये घेते. तिच्याकडे Levi’s, Dyson, Asian Paints, Jio या सारखे मोठे ब्रँड्स आहेत. दीपिकाने अनेक सौंदर्य आणि फॅशन स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे. दीपिकाची एकूण संपत्ती 500 कोटी रुपये आहे. म्हणजेच या दोघांची ज्वाइंट नेटवर्थ 745 कोटी रुपये आहे. आता त्यांची चिमुकली या संपत्तीची उत्तराधिकारी आहे.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.