अर्ध्या वयात नियतीने पत्नीला हिरवलं, पण ‘तो’ आयुष्यभर…. शशी कपूरची अशीही एक प्रेमकथा
हा नायक सिनेमाच्या पडद्यावर कधी आपले प्रेम मिळविण्यासाठी झगडत होता. तर, कधी प्रेमात आकंठ बुडून प्रेमवेडा झालेला दिसला. त्याच्या खाजगी आयुष्यातही तो चित्रपटाच्या नायकाचे आयुष्यच जगला. हा नायक आहे सिनेमातला राजबिंडा नायक शशी कपूर...

मुंबई : जगात क्वचितच अशी एखादी व्यक्ती असेल ज्याने आयुष्यात कधीही प्रेम केले नसेल. प्रेम हे ते वादळ आहे. जे महासागराच्या पुरासारखे, ज्वालामुखीच्या लाव्हासारखे आयुष्यात येते. पण जेव्हा ते आयुष्यात येते तेव्हा प्रत्येकजण त्याच्या प्रवाहापुढे, त्याच्या शक्तीपुढे नतमस्तक होतो. पण, अनेकांना प्रेम कसे करावे आणि ते कसे टिकवायचे हे माहित नसते. प्रेमात कधी आणि केव्हा शरणागती पत्करावी, साखरेच्या खड्याप्रमाणे पाण्यात कसे विरघळून जावे, एकरूप व्हावे हे प्रत्येकालाच कळत नाही. पण, या कथेतला नायक मात्र त्याला अपवाद आहे. हा नायक सिनेमाच्या पडद्यावर कधी आपले प्रेम मिळविण्यासाठी झगडत होता. तर, कधी प्रेमात आकंठ बुडून प्रेमवेडा झालेला दिसला. त्याच्या खाजगी आयुष्यातही तो चित्रपटाच्या नायकाचे आयुष्यच जगला. हा नायक आहे सिनेमातला राजबिंडा नायक शशी कपूर… प्रत्येक कथेचा नायक जसा शशी कपूर नसतो त्याचप्रमाणे नायिका जेनिफर केंडल ही देखील नसते. शशी कपूर यांची प्रेमकथा एक आगळीवेगळी अशीच आहे. ...
