‘माझ्या एका किसमुळे..’; धर्मेंद्र यांनी नात राजवीर देओलच्या सीनशी केली तुलना

'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटातील एक सीन सोशल मीडियावर खूप चर्चेत आला होता. दिग्गज अभिनेते धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या लिप-लॉकचा हा सीन होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत धर्मेंद्र यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

'माझ्या एका किसमुळे..'; धर्मेंद्र यांनी नात राजवीर देओलच्या सीनशी केली तुलना
Dharmendra and Shabana AzmiImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 23, 2023 | 7:24 PM

मुंबई : 23 ऑक्टोबर 2023 | करण जोहरचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट जेव्हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला, तेव्हा रणवीर आणि आलियाच्या केमिस्ट्रीपेक्षा जास्त ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या किसिंग सीनची चर्चा झाली. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत धर्मेंद्र यांनी त्यावर पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी त्यांच्या किसिंग सीनची झालेल्या चर्चेची तुलना नात राजवीर देओलच्या ‘दोनो’ या पहिल्यावहिल्या चित्रपटातील किसशी केली. राजवीर हा सनी देओलचा मुलगा असून नुकतंच त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय.

धर्मेंद्र यांची प्रतिक्रिया

“चित्रपट हे प्रेक्षकांसोबत जोडून राहण्याचं एक माध्यम आहे. माझ्या हृदयाला ज्या भूमिका भावतात, त्याच मी निवडतो. माझ्या नातवाने या चित्रपटात किती किसिंग सीन दिले हे मला माहीत नाही, पण माझ्या फक्त एका किसिंग सीनची इतकी चर्चा झाली”, असं धर्मेंद्र म्हणाले. राजवीरने पूनम ढिल्लोंची मुलगी पालोमा हिच्यासोबत ‘दोनों’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पहिलं पाऊल ठेवलं आहे. मात्र या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विशेष कामगिरी केली नाही.

हेमा मालिनी यांच्या बर्थडे पार्टीबद्दल काय म्हणाले धर्मेंद्र?

या मुलाखतीत धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्या बर्थडे पार्टीचाही उल्लेख केला. हेमा मालिनी यांनी नुकताच आपला 75 वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्त त्यांनी जंगी पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. “आम्हाला प्रत्येकाकडून मिळत असलेलं इतकं प्रेम आणि आशीर्वाद म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. तो एक आनंदी क्षण होता. मी माझा वाढदिवस साजरा करत नाही. कधी कधी मला असं वाटतं की मला माझ्या वाढदिवसाची तारीखच लक्षात असू नये”, असं धर्मेंद्र पुढे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

धर्मेंद्र यांनी करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. या चित्रपटातील त्यांच्या किसिंग सीनची जोरदार चर्चा झाली होती. अभिनेत्री शबाना आझमी यांच्यासोबतचा हा त्यांचा किसिंग सीन होता. धर्मेंद्र आणि शबाना झामी यांच्या किसिंग सीनवर आतापर्यंत हेमा मालिनी, सनी देओल आणि जावेद अख्तर यांनी मोकळेपणे प्रतिक्रिया दिली होती.

आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.