Dhurandhar : जाणून घ्या धुरंधर फेम रेहमान डकैतची मुंबईतील प्रॉपर्टी, मालमत्ता आणि…
Dhurandhar Akshaye Khanna Net Worth: अभिनेता अक्षय खन्ना सध्या 'धुरंधर' सिमेमामुळे तुफान चर्चेत आहे. विशेषतः अक्षय त्याच्या एन्ट्रीमुळे सर्वत्र चर्चत आहे... तर जाणून घ्या विनोद खन्ना यांचा मुलगा अक्षय खन्ना याची संपत्ती

Dhurandhar Akshaye Khanna Net Worth: बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता अक्षय खन्ना सध्या ‘धुरंदर’ सिनेमामुळे सर्वत्र चर्चेत आहे. सिनेमातील त्याचा “रेहमान डाकू” ही भुमिकेला प्रेक्षक आणि समीक्षकांनी डोक्यावर घेतली आहे… विशेषतः त्याचा एन्ट्री सीन सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सध्या सर्वत्र अक्षय खन्ना याची चर्चा सुरु असताना… अभिनेत्याच्या संपत्तीबद्दल देखील मोठी माहिती समोर आली आहे. मुंबईत अक्षय याची गडगंज संपत्ती आहे… तर अभिनेत्याकडे किती संपत्ती आहे जाणून घेऊ…
अक्षय याच्या करियरची दमदार सुरुवात…
1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हिमायल पूत्र’ सिनेमातून अक्षय खन्ना याने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. पण सिनेमा बॉक्स ऑफिसवर फेल ठरला… त्यानंतर अक्षय ‘बॅर्डर’ सिनेमात दिसला… ज्यामध्ये अभिनेत्याच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीत मोठी वाढ झाली. त्यानंतर अक्षय याने कधीच मागे वळून पाहिलं नाही, ‘दिल चाहता है’, ‘हमराज’, ‘हंगामा’, ‘हलचल’, ‘दृश्यम 2’ आणि नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ सिनेमात अभिनेता दमदार भूमिका साकारताना दिसला…
‘धुरंधर’ सिनेमात धमाकेदार एन्ट्री…
“धुरंधर” मधील अक्षयचा एन्ट्री सीन अप्रतिम आहे. वाळवंटात काळे चष्मे घातलेला तो त्याच्या गँगस्टर लूकमध्ये भयानक आणि शात दिसतोय. या सीननंतर बहरीन रॅप ‘FA9LA’ एक रात्री हीट झाला आहे… सोशल मीडियावर त्याचे अनेक व्हिडीओ देखील व्हायरल होत आहेत… अक्षय खन्ना याची नेटवर्थ…
रिपोर्टनुसार, अक्षय खन्ना याची एकून संपत्ती जवळपास 167 कोटी रुपये आहे. अभिनेता सोशल मीडियावर सक्रिय नाही. पण त्याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. अक्षय प्रचंड साध्या पद्धतीने आयुष्य जगत आहे. अक्षय याच्याकडे मुंबईच्या पॉश परिसरांमध्ये आलिशान प्रॉपर्टी आहे… जुहू, मलबार हिल आणि तारदेव येथे अनेक आलिशान घरे आहेत. त्यांची रिअल इस्टेट 100 कोटींपेक्षा जास्त किमतीची असल्याचं सांगितलं जात आहे.
कार कलेक्शन…
अक्षय खन्ना याच्या कार कलेक्शनमध्ये देखील अनेक महागड्या गाड्या आहेत. ज्यामध्ये मर्सिडीज-बेंझ एस-क्लास, बीएमडब्ल्यू 5 सिरीज, टोयोटा फॉर्च्युनर सारख्या लक्झरी कारचा समावेश आहे. सध्या सर्वत्र अक्षय खन्ना याची जादू पाहायला मिळत आहे.
‘धुरंदर’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमात रणवीर सिंग, संजय दत्त, अक्षय खन्ना, आर. माधवन आणि अर्जुन रामपाल यांनी मुख्य भूमिका बजावली आहे. ‘धुरंदर’ सिनेमा 5 डिसेंबर 2025 मध्ये प्रदर्शित झाला असून, सिनेमाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत जवळपास 126.57 रुपयांचं कलेक्शन केलं आहे.
