3 वेळा लग्न… 2 मुली पदरात असताना प्रसिद्ध अभिनेत्री करणार चौथं लग्न, म्हणाली…
मुंबईत येताच त्याने केलेली लग्नाची तयारी, तीन वेळा लग्न केल्यानंतर टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री चौथ्या लग्नासाठी सज्ज... दोन मुली पदरात असताना करणार चौथं लग्न... अभिनेत्रीने स्वतःच केलाय मोठा खुलासा...

झगमगत्या विश्वात सेलिब्रिटी त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. आता देखील एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. तीन वेळा लग्न आणि दोन मुलींची आई असताना अभिनेत्रीने चौथं लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. अशात तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की, ही अभिनेत्री नक्की आहे तरी कोण, तर, सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री देबिना बनर्जी आहे…
नुकताच, देबिना बनर्जी पती आणि अभिनेता गुरमीत चौधरी याच्यासोबत एल्विश यादव याच्या पॉडकास्टमध्ये पोहोचली होती… यावेळी देबिना हिने चौथ्यांदा लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली… कुठे आणि कसे कपडे घालायचे… याबद्दल देखील अभिनेत्रीने इच्छा व्यक्त केली आहे. अनेकांना माहिती नसेल, देबिना हिने तीन वेळा गुरमीत याच्यासोबत लग्न केलं आहे. आता तिला पती गुरमीत याच्यासोबत चौथ्यांदा लग्न करायचं आहे.
पॉडकास्टमध्ये एल्विश म्हणतो, तुमचं तीन वेळा लग्न झालं आहे. तर तुमचं एखादं लग्न तरी मुलींना पाहिलं आहे का? यावर गुरमीत म्हणाली, विचार तर चांगला आहे… आम्ही तीन वेळा लग्न केलं आहे… आता चौथ्यांदा करु, तेव्हा मुली पण आमचं लग्न पाहातील… तेव्हा देबिना म्हणाली, मला व्हाइट वेडिंग करायचं आहे..
देबिना पुढे म्हणाली, ‘मी तर गर्वाने सांगेल की, आम्ही लहान होतो तेव्हा मंदिरात जाऊन लग्न केलं होतं. मी साऊथमध्ये सिनेमात करत होती. तेव्हा फोनवरच रोमान्स व्हायचा… तेव्हा मी गुरूला म्हणाली, तल चल लग्न करुन घेऊ… तेव्हा गुरु देखील म्हणाला की, ठिक आहे… जेव्हा त्याला कळलं की मी मुंबईत येत आहे… त्याने घरातच लग्नाची तयारी केली होती. तेव्हा आमचं पहिल्यांदा लग्न झालं होतं.’
गुरमीत आणि देबिना यांनी कधी – कधी केलं लग्न?
गुरमीत आणि देबिना यांचं पहिलं लग्न 2006 मध्ये झालं होतं. दुसरं लग्न 2011 मध्ये झालं आणि तिसरं लग्न 2021 मध्ये झालं होतं… आता, देबिनाला लॉस एंजेलिसमध्ये गुरमीतशी लग्न करायचं आहे. देबिनाने सांगितलं की तिने तीन वेळा लग्न केलं आहे, पण मोठ्या जल्लोषात झालेलं नाही. देबिना आणि गुरमीत कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात.
