AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gadar 2 | ‘गदर 2’ प्रदर्शित होण्याआधीच अमीषा पटेलचा दिग्दर्शकांसोबत मोठा वाद; आरोपांवर दिलं उत्तर..

'गदर 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यापूर्वीच यामध्ये सकिनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अमिषा पटेल वादात सापडली आहे. अमिषाने या चित्रपटाच्या निर्मिती संस्थेवर काही आरोप केले आहेत. त्यावर आता दिग्दर्शकांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Gadar 2 | 'गदर 2' प्रदर्शित होण्याआधीच अमीषा पटेलचा दिग्दर्शकांसोबत मोठा वाद; आरोपांवर दिलं उत्तर..
| Updated on: Dec 25, 2024 | 3:49 PM
Share

मुंबई : अभिनेत्री अमीषा पटेल लवकरच ‘गदर 2’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तब्बल 22 वर्षांनंतर ‘गदर : एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा सीक्वेल प्रदर्शित होत आहे. यामध्ये अमीषा पुन्हा एकदा सकिनाच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. मात्र हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच अमीषा तिच्या वादगस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने या चित्रपटाच्या प्रॉडक्शन हाऊसवर काही आरोप केले होते. चित्रपटाच्या सेटवरील व्यवस्थापन योग्य नसल्याचा खुलासा तिने केला होता. त्यावर आता दिग्दर्शक आणि निर्माते अनिल शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी अमीषाचे सर्व आरोप फेटाळले आहेत.

अमीषाचे आरोप

‘चंदीगडमध्ये मे महिन्यात गदर 2 या चित्रपटाच्या अंतिम शेड्युलचं शूटिंग पार पडलं. यावेळी अनिल शर्मा प्रॉडक्शन्सकडून काही घटना घडल्याचं चाहत्यांच्या कानावर पडलं आणि त्यांनी काळजी व्यक्त केली. अनिल शर्मा प्रॉडक्शन्सकडून काही तंत्रज्ञ, मेकअप आर्टिस्ट्स, कॉस्च्युम डिझायनर्स यांसह इतर काही जणांना योग्य मानधन न मिळाल्याची तक्रार होती. हे खरं आहे. पण झी स्टुडिओजने पुढाकार घेतला आणि सर्वांचं थकलेलं मानधन देण्यात आलं’, असा खुलासा तिने केला होता.

आपल्या या ट्विटमध्ये तिने पुढे लिहिलं होतं, ‘होय राहण्याची व्यवस्था, प्रवासाचा खर्च, जेवणाचा खर्च यापैकी कोणतीच गोष्ट काही कलाकारांना आणि चित्रपटाच्या टीममधील क्रू मेंबर्सना देण्यात आली नव्हती. कारची सोय न केल्याने काही जणांना ताटकळत राहावं लागलं होतं. पण याबाबतही झी स्टुडिओजने खूप मोठी मदत केली. अनिल शर्मा प्रॉडक्शन्सकडून निर्माण झालेल्या समस्यांचं निवारण झी स्टुडिओजने केलं.’

अनिल शर्मा यांचं प्रत्युत्तर

दैनिक भास्करला दिलेल्या या मुलाखतीत अनिल शर्मा म्हणाले, “अमीषाने हे सगळं का म्हटलं ते मला माहीत नाही. मात्र त्यात काहीच तथ्य नाही. मी फक्त इतकंच म्हणेन की हे सर्व आरोप खोटे आहेत. त्याचसोबत मी अमीषा यांना धन्यवाद म्हणू इच्छितो कारण तिने माझ्या प्रॉडक्शनचं नावलौकिक केलं. यापेक्षा मोठी गोष्ट काय होऊ शकते. आमच्या नव्या प्रॉडक्शनला प्रसिद्ध करण्यासाठी तिचे आभार.”

2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर : एक प्रेम कथा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालता होता. तारा सिंग आणि सकीनाच्या प्रेमकहाणीने बरीच वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. आता तब्बल 22 वर्षांनंतर या चित्रपटाचा सीक्वेल प्रदर्शित होणार आहे. सनी देओल आणि अमीषा पटेल हे पुन्हा एकदा तारा सिंग आणि सकीनाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ.