थोडक्यात बचावली जिनिलिया; ड्रायव्हरकडून घडली एक चूक, पण जिनिलियाच्या वागण्याने जिंकली सर्वांची मने
जिनिलिया देशमुख मुंबईत तिच्या मुलांसह गाडीत बसताना एक घटना घडली. ड्रायव्हरच्या एका चुकीमुळे जिनिलिया थोडक्यात वाचली आहे. पण तिने यावेळी जे केलं ते पाहून नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं आहे.

बॉलिवूडमधील अभिनेत्रींसोबत असे अनेक किस्से घडतात की ते कॅमेऱ्यात कैद होतात. असाच एक किस्सा घडला आहे अभिनेत्री जिनिलिया डिसूझा देशमुखसोबत. जिनिलिया तिच्या मुलांसोबत रायन आणि राहिलसोबत मुंबईत दिसली. एका व्हिडिओमध्ये असं दिसून येत आहे की, हे तिघेही गाडीकडे जात आहेत आणि जेव्हा जेनेलिया मुलांसोबत गाडीत बसायला गेली पण गाडीचा दरवाजा अजूनही उघडा होता आणि ड्रायव्हर गाडी चालवून निघून गेला. जेनेलिया अजून आत जाऊ शकली नव्हती. पण या घटनेनंतर तिची प्रतिक्रिया पाहिल्यावर लोक तिचे खूप कौतुक करत आहेत.
ड्रायव्हरने पटकन गाडी थांबवली अन्
ड्रायव्हर गाडी पुढे घेऊन जाऊ लागल्यावर लागल्यावरही जिनिलिया रागवली नाही. तिने काही सेकंद वाट पाहिली. ड्रायव्हरने पटकन गाडी थांबवली आणि अभिनेत्रीला सुरक्षितपणे गाडीत बसू दिलं. पण या घटनेनंतर जिनिलियाच्या जागी दुसरी कोणतीही अभिनेत्री असती तरी ती रागवली असती. पण जिनिलियाने असं काहीच केलं नाही. तिचा हा स्वभाव नेटकऱ्यांना भावला आहे. नेटकऱ्यांनी तिच्या या शांत आणि समजूतदार स्वभावाचे, त्यावेळी तिने दाखवलेल्या संयमाचे कौतुक केलं आहे. यावेळी जिनिलियाने टी-शर्ट मिडी ड्रेस घातला होता, जो स्टाईल आणि क्लास दोन्ही दाखवत होता. तिच्या केसांच्या स्टाईलिंगसाठी, तिने तिचे केस एका आकर्षक पोनीटेलमध्ये बांधलेले दिसत आहेत.
जिनिलियाची जोडी आता आमीरसोबत
जिनिलिया सध्या आमिर खानसोबत ‘सितार जमीन पर’ या आगामी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन केल्यामुळे चर्चेत आहे. ‘तारे जमीन पर’च्या आगामी सिक्वेलमध्ये ती आमिर खानची प्रेयसी म्हणून दिसणार आहे. ‘जाने तू… या जाने ना’ या चित्रपटानंतर आमिर खान प्रॉडक्शनसोबतचा हा त्याचा आणखी एक सहकार्य आहे. तिने या रोमँटिक कॉमेडी चित्रपटात इम्रान खानसोबत काम केले होते.
View this post on Instagram
आमिर खानसोबत काम करणे खास
एका मुलाखतीत, जिनिलियाने आमिर खानसोबत चित्रपटाचा भाग असल्याबद्दल सांगितले आहे. ती म्हणाली, ‘इतक्या वर्षांनंतर, आमिर खान प्रॉडक्शनसोबत काम करणे खूप खास वाटतेय. ही भूमिका मी आतापर्यंत साकारलेल्या कोणत्याही भूमिकेपेक्षा वेगळी आहे. ट्रेलरला मिळालेल्या प्रेमाबद्दल मी खरोखर आभारी आहे आणि मी प्रेक्षकांकडून चित्रपट पाहण्याची वाट पाहत आहे. दरम्यान आमिर खान आणि जिनिलिया डिसूझा व्यतिरिक्त ‘ सितारे जमीन पर ‘ मध्ये आरुष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, संवित देसाई, वेदांत शर्मा आणि सिमरन मंगेशकर यांसारख्या नावांसह दहा नवीन कलाकार आहेत.
