AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amitab Bachchan : ‘तुझं करिअर बिघडवेन..’ जेव्हा बिग बींनी प्रसिद्ध गायकाला दिली धमकी !

When Amitabh Bachchan Warned Singer : अमिताभ बच्चन केवळ अभिनयाचे शहेनशाह नाही तर ते त्यांचा उत्तम सेन्स ऑफ ह्यूमर आणि मजेशीर स्वभावामुळेही ओळखले जातात. कधीकधी एकदम कडक अंदाजात बोललेल्या शब्दांमागे मजेशीर काहीतरी असं लपलेलं असतं. बिग बी यांचा राग जेवढा कठोर आहे, तेवढाच त्यांचा सेन्स ऑफ ह्यूमरही जबरदस्त आहे, हे इंडस्ट्रीत बऱ्याच जणांना माहीत आहे. त्यांच्या रागाच सामना असाच एका गायकाला करावा लागला होता. नेमकं काय झालं होतं ?

Amitab Bachchan : 'तुझं करिअर बिघडवेन..' जेव्हा बिग बींनी प्रसिद्ध गायकाला दिली धमकी !
अमिताभ बच्चन धमकी देतात तेव्हा...Image Credit source: social media
| Updated on: Nov 08, 2025 | 2:46 PM
Share

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे त्यांच्या चित्रपटांबद्दल जितके समर्पित आहेत त्यांना त्यांच्या गाण्यांबद्दलही तितकंच प्रेम आहे. 83 व्या वर्षीही अथक मेहनत करून काम करणाऱ्या बिग बी यांनी अनेक ब्लॉकबस्टर तर कधी फ्लॉप चित्रपटही दिले आहेत. ज्या वयात बहुतेक लोक फक्त विश्रांती घेतात, त्या वयात बिग बी हे आजच्या तरुण स्टार्सनाही कडी टक्कर देता. गेल्या सहा दशकांपासून इंडस्ट्रीमध्ये सक्रिय असलेले बिग बी यांच्याकडे सिनेमाशी संबंधित अनेक कथा आहेत, ज्या ते अनेकदा सांगतात. खूप शांत आणि गंभीर दिसणारे अमिताभ बच्चन यांनी एकदा शंकर महादेवन यांना धमकी दिली होती यावर तुम्हाला विश्वास बसेल का?

शंकर महादेवनला बिग बी धमकी देतात तेव्हा..

हो हे खरं आहे. खरंतर हा किस्सा बिग बी यांच्या ‘कजरा रे’ या ऑयकॉनिक गाण्यावेळचा आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांनी बॉलिवूडला अनेक हिट गाणी दिली आहेत. पण “बंटी और बबली” चित्रपटातील “कजरा रे” हे सुपरहिट गाणे आजही चाहत्यांच्या हृदयात कोरले गेले आहे. 20 वर्षानंतरही हे गाणं अनेकदा पार्ट्यांमध्ये वाजत असतं. तेव्हा अमिताभ यांनी दिलेली धमकी शंकर महादेवन यांना अजूनही लक्षात आहे

अलिकडेच, ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ च्या ‘ऑल इंडिया मेहफिल’ पॉडकास्टमध्ये, त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या धमकीबद्दल सांगितलं होतं. शंकर महादेवन म्हणाले, “मी अमिताभ सरांना ‘कजरा रे’ चा एक भाग डब करायला सांगितले होते. त्यांनी विचारले, ‘कोणतं गाणं?'” मी जेव्हा नावं सांगितलं, तेव्हा ते म्हणाले ‘मी ते आधीच शूट केले आहे. जर तू त्याला (गाण्याला) हातही लावलास तर मी तुझं करिअर उद्ध्वस्त करेन.’ त्यांचं हे बोलणं ऐकून सर्वांना धक्का बसला पण बिग बी मात्र जोरात हसायला लागले. शंकर महादेवन हसले आणि म्हणाले, “सरांना माझा रफ व्हर्जन इतका आवडलं की त्यांना तो बदलायचा नव्हता. आणि गाणं फायनल झालं.” असा किस्सा त्यांनी सांगितलं.

त्यानतर त्यांनी आणखी एक किस्सा सांगितला. ते म्हणाले ‘कभी अलविदा ना कहना’ मधील गाणं होतं ‘रॉक एन रोल सोनिये’. जेव्हा मी शूटिंग सेटवर पोहोचले तेव्हा बिग बींनी त्याला आनंदाने मिठीत मारली. ते म्हणाले “किती सुंदर गाणं बनवले आहेस…”. “सर खूप गोड आहेत, ते नेहमीच मला प्रोत्साहन देतात.” असंही शकर यांनी नमूद केलं.

“बंटी और बबली” मधील “कजरा रे” मध्ये गुलजार यांनी गीतलेखन केलं असून शंकर-एहसान-लॉय यांचे संगीत आहे. ऐश्वर्या राय बच्चन, अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यावर शूट झालेल्या या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन वैभवी मर्चंटने केले होते. हे गाणे कव्वाली आणि कजरी शैलीचे उत्तम संयोजन असल्याचे सिद्ध झाले, आजही हे गाणं खूप लोकप्रिय असून पार्टीमध्ये हमखास वाजतचं.

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.