AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

42 वर्षीय अभिनेत्री, मुस्लिम क्रिकेटरसोबत होतं अफेअर, इंडस्ट्रीला केला रामराम; आता जगतेय असं आयुष्य

Bollywood Actress : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री क्रिकेटपटूसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आलेली. आज अभिनेत्री अभिनयापासून दूर आहे.

| Updated on: Oct 14, 2026 | 5:12 PM
Share
बॉलिवूडमध्ये काही कलाकार आपल्या अभिनयामुळे ओळखले जातात, तर काही जण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहतात. अभिनेत्री ईशा शरवानी हीदेखील अशाच कलाकारांपैकी एक आहे. आपल्या नृत्यकौशल्यानं आणि अभिनयानं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणाऱ्या ईशाचं नाव भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानसोबत जोडलं गेलं होतं.

1 / 6
 दोघांच्या अफेअरची अनेक वर्षे चर्चा रंगली, मात्र त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. सध्या ईशा चित्रपटसृष्टीपासून दूर आहे.

2 / 6
ईशा शरवानीने २००५ मध्ये दिग्दर्शक सुभाष घई यांच्या ‘किसना’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात ती अभिनेता विवेक ओबेरॉयसोबत झळकली होती. आपल्या अभिनयासोबतच नृत्यामुळेही तिनं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं.

3 / 6
यानंतर ईशानं ‘यू मी और हम’, ‘दरवाजा बंद रखो’, ‘लक बाय चान्स’ आणि ‘करीब करीब सिंगल’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. तिनं काही तमिळ आणि मल्याळम चित्रपटांतही भूमिका साकारल्या. मात्र, हिंदी चित्रपटसृष्टीतील तिचा प्रवास फार काळ टिकला नाही आणि हळूहळू ती मोठ्या पडद्यापासून दूर गेली.

4 / 6
ईशा शरवानीचं नाव भारतीय क्रिकेटपटू झहीर खानसोबत जोडलं गेलं होतं. दोघं जवळपास आठ वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. त्यांच्या लग्नाबाबतही अनेकदा बातम्या समोर आल्या. मात्र, दोघांनीही आपल्या नात्याबाबत सार्वजनिकरीत्या स्पष्टीकरण दिलं नव्हतं.

5 / 6
चित्रपटांमध्ये फार काळ सक्रिय नसली, तरी ईशानं आपल्या आवडीच्या क्षेत्राशी असलेलं नातं कायम ठेवलं आहे. ती एक कुशल नृत्यांगना असून एरियल डान्समध्येही तिनं प्रावीण्य मिळवलं आहे. ईशा विविध ठिकाणी नृत्याचं सादरीकरण करते आणि नृत्याचं प्रशिक्षणही देते. जगभरातील प्रेक्षकांसमोर थेट कार्यक्रम सादर करण्यावर तिचा भर आहे. त्यामुळे अभिनयापासून दूर गेल्यानंतरही तिनं आपली वेगळी ओळख जपली आहे. ईशा सध्या ऑस्ट्रेलियात राहतेय. ती सिंगल पॅरेन्ट म्हणून मुलाचा सांभाळ करत आहे. मात्र, तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबतची सर्व माहिती सार्वजनिकरीत्या उपलब्ध नाही.

6 / 6
Follow Us
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप
बीडमध्ये भीषण पाणीटंचाई! 375 गोवंश तहानलेले, गोशाळेला टँकरवर अवलंबून..
बीडमध्ये भीषण पाणीटंचाई! 375 गोवंश तहानलेले, गोशाळेला टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ
ऐन नवरात्रीत तुळजापुरात दोन गटांत वाद, नेमकं काय घडलं?
Dharashiv : ऐन नवरात्रीत तुळजापुरात दोन गटांत वाद, नेमकं काय घडलं?
दिल्लीतील आंदोलनात पोलिसांची मारहाण अन्...; आंदोलकांनी सांगितला.....
Rahul Gandhi PC : दिल्लीतील आंदोलनात पोलिसांची मारहाण अन्...; आंदोलकांनी सांगितला धक्कादायक अनुभव
राष्ट्रवादी आमदार इद्रिस नायकवडींना धमकीचं पत्र; प्रकरण काय?
Sangli NCP : समान नागरी कायद्याच्या विरोधाची भूमिका भोवली? राष्ट्रवादी आमदार इद्रिस नायकवडींना धमकीचं पत्र; प्रकरण काय?
ज्ञानेश कुमारांविरोधात मनसेचं अनोखं आंदोलन; सेल्फी विथ ज्ञानू....
MNS : ज्ञानेश कुमारांविरोधात मनसेचं अनोखं आंदोलन; सेल्फी विथ ज्ञानू....
MPSC आंदोलनाच्या यशानंतर राज ठाकरेंचा विवेकानंद पाटलांना फोन....
MPSC आंदोलनाच्या यशानंतर राज ठाकरेंचा विवेकानंद पाटलांना फोन; नेमकी चर्चा काय?