सोनू सूदची कोरोनावर मात, आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर करताच कंगना म्हणाली…

बॉलिवूडचा ‘मसीहा’ अर्थात अभिनेता सोनू सूद (sonu sood) याने यशस्वीरित्या कोरोनाचा पराभव केला आहे. शुक्रवारी सोनूने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले की, त्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

सोनू सूदची कोरोनावर मात, आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर करताच कंगना म्हणाली...
सोनू सूद आणि कंगना रनौत
Follow us
| Updated on: Apr 24, 2021 | 11:17 AM

मुंबई : बॉलिवूडचा ‘मसीहा’ अर्थात अभिनेता सोनू सूद (sonu sood) याने यशस्वीरित्या कोरोनाचा पराभव केला आहे. शुक्रवारी सोनूने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले की, त्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. सोनूच्या या पोस्टवर अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हीनेही प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाने त्याचे संपूर्ण श्रेय भारतात तयार झालेल्या लसीला दिले आहे. कंगना म्हणते की, भारतात तयार केलेल्या लसीच्या वापराने सोनू सूद इतक्या लवकर बरा झाला आहे. कंगनाने पुढे सोनूला भारतात बनवलेल्या लसीविषयी लोकांना जागरूक करण्यास सांगितले आहे (Kangana Ranaut comments on sonu sood corona negative post).

कंगनाने ट्विट केले आहे, ‘सोनू जी, मला वाटते की तुम्ही कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आणि त्यामुळेच इतक्या लवकर बरे होऊ शकला आहात. आपण भारतात तयार केलेल्या या लसीचे कौतुक केले पाहिजे आणि ही लस घेण्यासाठी लोकांना जागरूक देखील केले पाहिजे.’

येथे वाचा कंगना रनौत यांचे ट्विट

कंगनाच्या या ट्वीटवर युजर्स बऱ्याच कमेंट करत आहेत. कोणी विचारत आहे की, आपल्याला लस कधी मिळेल? तर कोणी म्हणत आहे की सोनू लवकरच स्वतःची लस घेऊन येईल… मात्र, कंगनाच्या या ट्विटवर सोनूची काय प्रतिक्रिया असेल, तो तिला काय उत्तर देईल? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे (Kangana Ranaut comments on sonu sood corona negative post).

सोनूची झटपट कोरोना रिकव्हरी

सोनू एका आठवड्यातच कोरोना निगेटिव्ह झाला आहे. 17 एप्रिलला सोनू सूद कोरोना पॉझिटिव्ह झाला होता, त्यानंतर त्याची 23 एप्रिलला कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली. कोरोना पॉझिटिव्ह होण्यापूर्वी सोनूने 10 दिवस आधी लस टोचून घेतली होती. कोरोना झाल्यानंतर अभिनेता बर्‍याच दिवसांपासून घरीच स्वत:ची काळजी घेत होता. तर, यादरम्यान देखील सोनू सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव होता, तिथे तो सतत लोकांना मदत करत होता.

सोनूने शेअर केला कोरोना लढाईचा अनुभव

आपण कोरोनाशी लढाई कशी लढावी, हे सोनूने काही दिवसांपूर्वी सांगितले होते. सोनू म्हणतो की, आपण कोरोना पॉझिटिव्ह असाल तर औषधांसह आपल्याला स्वतःला सकारात्मक ठेवावे लागेल आणि अशा प्रकारे आपण लवकरच बरे होऊ शकता. तो म्हणाला होता की, ‘मी सर्वांना सांगू इच्छितो की जर तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह असाल तर, तुमची काळजी घ्या कारण कोणीही इतर तुमची काळजी घेणार नाही आणि ही कोरोनाची सर्वात भयानक गोष्ट आहे.’

सोनू पुढे म्हणाला, ‘कोरोनाशी लढा देण्यासाठी स्वत: सकारात्मक असले पाहिजे. आपल्‍याला नेहमीच सुपर चार्ज राहावे लागेल, कोणत्याही वेळी लो फील होऊ नये. फक्त यावर लक्ष केंद्रित करा की, आपल्याला कोरोनामधून रिकव्हर व्हायचे आहे.’

(Kangana Ranaut comments on sonu sood corona negative post)

हेही वाचा :

रहमाननं 25 गायिकांना ऐकलं पण मग बेलालाच का निवडलं? ऐका, बघा हा Video

Shravan Rathod | कोरोनाची लागण होण्यापूर्वी पत्नीसमवेत कुंभमेळ्यात सामील झाले होते श्रवण राठोड!

Non Stop LIVE Update
तर मी राजीनामा देऊन...., बीडमधील सभेत उदयनराजे भोसले भावूक
तर मी राजीनामा देऊन...., बीडमधील सभेत उदयनराजे भोसले भावूक.
...तर उद्धव ठाकरे लवकरच तुरुंगात दिसतील, अरविंद केजरीवाल यांचा दावा
...तर उद्धव ठाकरे लवकरच तुरुंगात दिसतील, अरविंद केजरीवाल यांचा दावा.
सरकार काय त्यांच्या..., अजित पवार यांचं बीडमधील भाषण चर्चेत
सरकार काय त्यांच्या..., अजित पवार यांचं बीडमधील भाषण चर्चेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि ठाकरे गट आमने-सामने
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि ठाकरे गट आमने-सामने.
स्पेशल रिपोर्ट : अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांची 'दादा'गिरी वादात
स्पेशल रिपोर्ट : अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांची 'दादा'गिरी वादात.
केजरीवालांची अटक राजकीय, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
केजरीवालांची अटक राजकीय, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.