AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Self Obsessed | कंगना रनौतने स्वतःची तुलना केली अमिताभ बच्चन यांच्याशी, म्हणते तापसी माझी मोठी फॅन!

सतत वादाच्या घेऱ्यात अडकलेली बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) पुन्हा एकदा वादात अडकली आहे.

Self Obsessed | कंगना रनौतने स्वतःची तुलना केली अमिताभ बच्चन यांच्याशी, म्हणते तापसी माझी मोठी फॅन!
कंगना रणौत
| Updated on: Jan 10, 2021 | 2:20 PM
Share

मुंबई : सतत वादाच्या घेऱ्यात अडकलेली बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) पुन्हा एकदा वादात अडकली आहे. नुकताच कंगनाने स्वत: ची तुलना थेट अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्याशी केली आहे आणि तापसी पन्नूला तिची चाहती म्हटले आहे. कंगनाच्या चाहत्याने तापसी पन्नूचा (Taapsee Pannu) एक फोटो शेअर केला आहे आणि लिहिले आहे की, कंगनाची 1000 वेळी कॉपी केली. कंगनाने हे ट्विट रिट्वीट करून स्वतःचे कौतुक केले आणि अमिताभ बच्चन नंतर स्वत: ला सर्वात कॉपी करण्यात येत असलेले स्टार म्हणून घेतले आहे. (Kangana Ranaut compared herself to Amitabh Bachchan)

कंगना रनौतने या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ती माझी खरी फॅन आहे. अमिताभ बच्चन नंतर मी सर्वात कॉपी केलेली स्टार आहे. कंगना रनौतने तिच्या आगामी ‘धाकड’चित्रपटाचे शूटिंग भोपाळमध्ये सुरू केले आहे. यावेळी कंगना ब्लॅक जॅकेट आणि जीन्समध्ये दिसत होती. कंगनाने नुकताच ए.एल. विजय दिग्दर्शित ‘थलायवी’ या तिच्या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. थलावली चित्रपट 26 जून 2020ला प्रदर्शित होणार होता. कोरोनामुळे हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार, असे म्हटले जात होते. मात्र, चित्रपट निर्मात्यांनी हा चित्रपट डिजिटली प्रदर्शित होणार नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे आता चित्रपटगृह सुरू होईपर्यंत या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहायला लागणार आहे.

कंगनाला आता तिच्या ट्विटर अकाउंटवर 30 लाख लोक फॉलो करत आहेत. कंगनाच्या सतत ट्विटमुळे तिचे अकाउंट चर्चेत राहते. 30 लाख लोक फॉलो करत असल्यचे स्वत : कंगनाने सांगितले आहे आणि यूजर्सचे आभार मानले आहेत. कंगनाने याबद्दलची पोस्ट शेअर केली आहे आणि लिहिले आहे की, मी ऑगस्टमध्ये ट्विटरवर आले होते. काही दिवसांपूर्वी मला फॉलो करणारे फक्त हजारांमध्ये होते मात्र, आता ते 30 लाख झाले आहेत. मी ट्विटरवर बराच वेळ घालवला आहे आणि तो मजेदार आहे, सर्वांचे आभार

संबंधित बातम्या : 

Hrithik Diet Plan : मिस्टर फिट हृतिकचा बर्थ डे, जाणून घ्या काय आहे त्याचा डाएट प्लॅन

Pataudi Palace | पतौडी पॅलेसमध्ये तांडवचं शूटिंग, परंतु या कारणामुळे सैफ अस्वस्थ!

(Kangana Ranaut compared herself to Amitabh Bachchan)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.