कार्तिक आर्यनचा ‘धमाका’ चित्रपट नेटफ्लिक्सवर करणार धमाल, पाहा टीझर 

बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) लवकरच ‘धमाका’ (Dhamaka)या थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे.

कार्तिक आर्यनचा ‘धमाका’ चित्रपट नेटफ्लिक्सवर करणार धमाल, पाहा टीझर 

मुंबई : बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) लवकरच ‘धमाका’ (Dhamaka)या थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. आज या चित्रपटाचे टीझर रिलीज झाले आहे. कार्तिकने सोशल मीडियावर हा टीझर शेअर करून चाहत्यांना याची माहिती दिली आहे. चित्रपटात कार्तिक एका न्यूज अँकरच्या भूमिकेत दिसणार आहे. (Kartik Aaryan’s Dhamaka will be released on Netflix)

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

कार्तिकने हा टीझर शेअर करताना लिहिले आहे की, मी अर्जुन पाठक आहे. मी जे काही बोलत आहे ते खरेच बोलतो आहे. नेटफ्लिक्सवर लवकरच धमाका होणार आहे. चित्रपटाच्या या टीझरमध्ये कार्तिक ओरडताना दिसत आहे. तो न्यूजरूममध्ये बसून बोलताना दिसत आहे तो म्हणत आहे मी हे करू शकत नाही. कार्तिक एका शोसाठी नकार देताना या टीझरमध्ये दिसत आहे.

या चित्रपटाची खास बाब म्हणजे या चित्रपटाचे शूटिंग 10 दिवसात पूर्ण झाले आहे. 22 नोव्हेंबरला चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती आणि शूटिंग डिसेंबरमध्ये 10 दिवसात पूर्ण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार निर्माता रॉनी स्क्रूवाला आणि दिग्दर्शक राम माधवानी हे लवकरात लवकर चित्रपट रिलीज करू इच्छित आहेत. म्हणून हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. यापूर्वी हा चित्रपट दिग्दर्शक राहुल ढोलकिया दिग्दर्शित करणार असल्याची बातमी मिळाली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

ज्याची चित्रपटाची कहाणी तापसी पन्नू लक्ष केद्रित ठेवून लिहिली होती, परंतू तापसीने हा चित्रपट करण्यासाठी नकार दिला होता. तापसीनंतर कृति सेनन या चित्रपटाची ऑफर देण्यात आली मात्र, तिनेही चित्रपट करण्यास नकार दिला होता. त्यानंतर राहुल आपल्या दुसऱ्या प्रकल्पांमध्ये व्यस्त झाले. यानंतर चित्रपटाचे हक्क राम माधवानी यांना विकले गेले. मग माधवानी यांनी आरएसव्हीपीसोबत एकत्र काम करून चित्रपटाची कथा पुन्हा लिहिली आहे.

संबंधित बातम्या : 

Bigg Boss : ज्यांना दिल्या शिव्या त्यांच्याच सोबत राखी सावंतची पार्टी, शो स्क्रिप्टेड असल्याची चर्चा!

श्रद्धा कपूरच्या स्लो मोशनमध्ये दिलखेचक अदा, डान्सचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल!

Miss world 2017 : मानुषी छिल्लर ‘या’ चित्रपटात विकी कौशलसोबत करणार रोमान्स!

(Kartik Aaryan’s Dhamaka will be released on Netflix)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI