Kiara Advani | रँप वॉक करताना कियाराने ‘खास व्यक्तीला’ दिलं फ्लाईंग किस, व्हिडीओ पाहून युजर्स म्हणाले – परफेक्ट बहू…
कियारा अडवाणीने मंगळवारी रँपवॉक केला. गुलाबी रंगाच्या या सुंदर ड्रेसमध्ये ती एखाद्या बार्बीसारखीच दिसत होती.

Kiara Advani Video : बॉलीवुडमधील नामवंत अभिनेत्रींपैकी एक असलेली कियारा अडवाणी (Kiara Advani) सध्या तिच्या ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत असून कियाराच्या कामाचेही खूप कौतुक होत आहे. कियाराने या वर्षीच फेब्रुवारी महिन्यात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत लग्नगाठ बांधली. प्रोफेशनल लाइफ आणि पर्सनल लाईफ या दोघांचाही उत्तम मेळ घालत ती काम करताना दिसत आहे.
कियाराचे तिच्या सासरच्यांशीही उत्तम संबंध असून सासूबाईंसोबतही तिचा उत्तम बाँड आहे. ती अनेक वेळा त्यांच्यासोबत स्पॉट झाली आहे. सध्या कियाराचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून रँपवॉक करताना तिच्या एका कृतीची खूप चर्चा होत आहे. तेथे तिने एका खास व्यक्तीला फ्लाईंग किस दिल्याने सर्वांचेच लक्ष तिकडे वेधलं गेलं.
झालं असं की मंगळवारी कियाराने India Couture Week 2023 मध्ये डिजाइनर फाल्गुनी आणि शेन पिकॉक यांच्या कलेक्शनसाठी रँपवॉक केला. या इव्हेंटमध्ये तिने गुलाबी रंगाचा सुंदर ड्रेस घातला होता, त्यामध्ये ती अतिशय सुंदरही दिसत होती. याच इव्हेंटमधील तिच्या रँपवॉकचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
खास व्यक्तीला दिले फ्लाईंग किस
या इव्हेंटसाठी सिद्धार्थ मल्होत्रा तर उपस्थित नव्हता, पण त्याची आई , कियाराची सासू मात्र आवर्जून उपस्थित होतीत. अतिशय ग्रेसफुली रँपवॉक करताना कियाराने साईडला बसलेल्या सासूबाईंना पाहून फ्लाईंग किस दिले. त्यांनीही तेवढ्याच प्रेमाने तिला फ्लाईंग किस देत तिच्यासाठी कौतुकाने टाळ्याही वाजवल्या. सासू-सुनेचे हे बॉंडिंग सर्वांनाच खूप आवडले असून या व्हिडीओवर त्यांचे कौतुकही होत आहे.
View this post on Instagram
चाहत्यांनी केल्या कमेंट्स
या व्हिडीओमध्ये , शो संपल्यावर कियारा तिच्या सासूची आणि नातेवाईकांची भेट घेतनाही दिसत आहे. दोघीही एकमेकांना प्रेमाने भेटल्या, मिठीही मारली. या व्हिडीओवर खूप कमेंट्स आल्या असून एका युजरने तर – (कियारा) परफेक्ट सून असल्याचे प्रशस्तीपत्रक दिले आहे. तर इतरांनीही कियाराच्या नम्रेतेचे, सासरच्या व्यक्तींना भेटण्याचे, ती ज्या पद्धतीने बोलत आहे, त्या सर्वांचे कौतुक केले आहे. काही लोक तर कियाराला इंडियन बार्बीदेखील म्हणत आहेत.
View this post on Instagram
