AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाहरुख खानला धमकी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; रायपूरमधून एकाला अटक

अभिनेता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. छत्तीसगडमधील रायपूर इथून फैजान खान नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. 5 नोव्हेंबर रोजी वांद्रे पोलीस ठाण्यात हा धमकीचा फोन आला होता.

शाहरुख खानला धमकी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; रायपूरमधून एकाला अटक
Shah Rukh Khan
| Updated on: Nov 12, 2024 | 11:19 AM
Share

मुंबईतील वांद्रे पोलिसांच्या लँडलाइनवर फोन करून अभिनेता शाहरुख खानकडून 50 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या वकील फैजान खानला पोलिसांनी अटक केली आहे. छत्तीगडमधील रायपूर इथून त्याला अटक करण्यात आली. फैजानला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यासाठी पोलीस ट्रान्झिट रिमांडची प्रक्रिया पूर्ण करत आहेत. 5 नोव्हेंबर रोजी वांद्रे पोलीस ठाण्यात धमकीचा फोन आला होता. तेव्हापासूनच पोलीस याप्रकरणाचा तपास करत होते. या तपासात फैजानबद्दल माहिती मिळताच पोलिसांनी त्याची चौकशी केली. पोलीस ठाण्यात धमकीचा फोन करण्यासाठी त्याचा मोबाइल फोन वापरला जात असल्याबद्दल त्याला विचारणा करण्यात आली. त्यावर उत्तर देताना त्याने घटनेच्या काही दिवस आधी 2 नोव्हेंबर रोजी आपला मोबाइल फोन चोरीला गेल्याचं पोलिसांना सांगितलं. मुंबईत चौकशीदरम्यान आरोपीचा हेतू स्पष्ट होईल, असं मुंबई पोलिसांनी याप्रकरणी सांगितलं आहे.

धमकीचा कॉल करण्यासाठी वापरण्यात आलेल्या मोबाइल नंबरवरून अधिकाऱ्यांनी फैजान खानचा शोध घेतला. वांद्रे पोलीस 7 नोव्हेंबर रोजी रायपूरला त्याच्या चौकशीसाठी रवाना झाले होते. मात्र फैजानने सांगितलं की त्याचा मोबाइल फोन 2 नोव्हेंबर रोजी चोरीला गेला होता. त्यानंतर त्याने स्थानिक पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली होती. वांद्रे पोलिसांच्या एफआयआरमध्ये असं नमूद केलंय की कॉलरने शाहरुख खानकडे 50 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. ही मागणी पूर्ण न केल्यास अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.

“बँडस्टँड इथल्या मन्नत बंगल्यात राहणाऱ्या शाहरुख खानने मला 50 लाख रुपये दिले नाही तर मी त्याला मारून टाकेन”, अशी धमकी फोनद्वारे देण्यात आली होती. पोलीस हवालदार संतोष धोडके यांनी फोन करणाऱ्याची ओळख आणि ठिकाणाबद्दल चौकशी केली असता धमकी देणाऱ्याने म्हटलं, “त्याने काही फरक पडत नाही. तुम्हाला काही लिहायचं असेल तर माझं नाव हिंदुस्थानी असं लिहा.”

बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी सलमान खान कनेक्शन-

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची दसऱ्याच्या दिवशी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडणारा आरोपी शिवकुमार गौतम उर्फ शिवा आणि त्याच्या साथीदारांसह एकूण पाच जणांना अटक केली. शिवकुमारच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. “बाबा सिद्दिकी यांना दाऊद इब्राहिम आणि अभिनेता सलमान खान यांच्याशी जवळचे संबंध असल्याने लक्ष्य करण्यात आलं होतं. वाँटेड आरोपी शुभम लोणकर स्नॅपचॅटद्वारे लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईसोबत संपर्कात असून हत्येच्या बदल्यात दहा लाख रुपये, परदेश दौरा आणि मासिक खर्च देण्याचं मान केलं होतं. अनमोल बिष्णोईला मुंबईत आपलं वर्चस्व गाजवायचं होतं आणि दहशत निर्माण करायची होती”, असा खुलासा त्याने पोलिसांच्या चौकशीत केला.

आरोपी शिवकुमार आणि यापूर्वी अटक करण्यात आलेला धर्मराज कश्यप हे बहराईच या एकाच गावचे रहिवासी आहेत. ते पुण्यात भंगाराचं काम करायचे. आरोपी शुभम लोणकर याचं भंगाराचं दुकान शेजारीच होतं. शुभम लोणकर लॉरेन्स बिष्णोईसाठी काम करतो. त्याने स्नॅपचॅटद्वारे लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईशी अनेकदा बोलायला लागल्याचंही सांगितलं. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येच्या बदल्यात हत्येनंतर दहा लाख रुपये देण्याचं आमिष दाखवलं होतं. तसंच दर महिन्याला काही ना काही मिळत राहील, असंही सांगण्यात आलं होतं.

अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना.
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल.
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी.
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार.
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?.
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट.
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग...
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग....
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं...
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं....
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश.
Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत
Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत.