श्रीमंत सुपरस्टार; दरवर्षी करोडो रुपये करतो दान अन् गरीब मुलांवर मोफत हार्ट सर्जरी
असा एक सुपरस्टार अभिनेता जो एका चित्रपटासाठी कोट्यावधींचे मानधन घेतो पण सोबतच करोडो रुपये दानही करतो.तसेच जवळपास 1000 हून अधिक लहान मुलांची मोफत हार्ट सर्जरी देखील त्याने करुन दिली आहे. कोण आहे हा अभिनेता माहितीये?

बॉलिवूडपासून ते दक्षिणेपर्यंत अनेक असे सेलिब्रिटी आहेत ज्यांची करोडोंची संपत्ती आहे. तसेच सर्व सेलिब्रिटींमध्ये सर्वात श्रीमंत सेलिब्रिटी म्हणून त्यांची वर्णी लागते. तसेच काही सेलिब्रिटी फक्त पैशांनेच नाही तर मनानेही फार श्रीमंत आहे. कारण ते त्यांच्या कमाईचा एक भाग समाजासाठी खर्च करतात. होयं, असाच एक सुपरस्टार आहे जो कोट्यावधींचं मानधन घेतो. पण दरवर्षी चक्क 30 कोटींपेक्षा जास्त रुपये दान करतो. एवढंच नाही तर मोफत उपचारही करून देतो.
दरवर्षी ते 25 ते 30 कोटी दान करतो हा सुपरस्टार
हा सुपरस्टार म्हणजे तेलुगू चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च नायक महेश बाबू. त्यांना दक्षिण भारतातील सर्वात मोठे देणगीदार मानले जाते. बॉक्स ऑफिसवर अनेक हिट चित्रपट देणाऱ्या महेश बाबूने अनेक गरीब लोकांचे जीवन बदललं आहे. महेश बाबू यांनी 40 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ते एक निर्माते देखील आहेत. महेश बाबूचे जगभरात करोडो चाहते आहेत. चाहते त्यांना प्रेमाने ‘टॉलीवूड प्रिन्स’ म्हणतात. महेश बाबू चित्रपटांमधून कोट्यवधी रुपये कमावतात. तर, दरवर्षी ते 25 ते 30 कोटी दान करतात.महेश बाबू अनेक स्वयंसेवी संस्थांशी जोडलेले देखील आहेत. ते रेनबो चिल्ड्रन्स हॉस्पिटलही चालवतात, जिथे गरीब मुलांना मोफत वैद्यकीय सुविधा आणि उपचार मिळतात.
1000 हून अधिक गरीब मुलांवर मोफत हृदय शस्त्रक्रिया
महेश बाबू फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी आंध्र प्रदेशातील बुरीपालम गाव आणि तेलंगणातील सिद्धपुरम गाव दत्तक घेतलं आहे. याशिवाय, प्युअर लिटिल हार्ट्स फाउंडेशन आणि रेनबो हार्ट इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून त्यांनी 1000 हून अधिक गरीब मुलांवर मोफत हृदय शस्त्रक्रिया केल्या आहेत. महेश बाबूची एकूण संपत्ती 135 कोटी रुपये असल्याचे सांगितले जातं. हैदराबादमध्ये त्यांचा 30 कोटींचा बंगला आहे. जुबली हिल्समध्ये असलेल्या या घरात जवळजवळ सर्व हाय-टेक सुविधा आहेत. महेश बाबूकडे 7 कोटी रुपयांची व्हॅनिटी व्हॅन देखील आहे. 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या ”सीतम्मा वकिटलो सिरिमल्ले चेत्तु’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांनी ती खरेदी केली होती.
View this post on Instagram
बालकलाकार म्हणून सुरुवात अन् आता एकापेक्षा हीट चित्रपट
1979 मध्ये बालकलाकार म्हणून कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या महेश बाबूंनी अनेक चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका केल्या. 1999 मध्ये वयाच्या 24 व्या वर्षी ते मुख्य अभिनेता बनले. सुरुवातीला महेश बाबूंनी सलग हिट चित्रपट दिले. 2007 मध्ये त्यांनी तीन वर्षांचा ब्रेक घेतला. त्यानंतर त्यांनी ‘दूकुडु’ आणि ‘बिझनेस मॅन’ सारख्या हिट चित्रपटांसह पुनरागमन केले.
1000 कोटींचे बजेट असलेल्या चित्रपटाचं शुटींग सुरु
आता महेश बाबू दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या चित्रपटात काम करत आहेत. यामध्ये प्रियंका चोप्रा देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पृथ्वीराज सुकमन देखील या चित्रपटाचा एक भाग असतील. महेश बाबूच्या या चित्रपटाचे बजेट 1000 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे.
