AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘भारत माझा देश आहे’ सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज, 6 मेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

आपण नुकताच शहीद दिन साजरा केला.त्यानिमित्त 'भारत माझा देश आहे' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. येत्या 6 मे रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. एबीसी क्रिएशन प्रस्तुत, डॉ. आशिष अग्रवाल निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन पांडुरंग कृष्णा जाधव यांनी केलं आहे.

'भारत माझा देश आहे' सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज, 6 मेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
'भारत माझा देश आहे'- सिनेमाImage Credit source: TV9
| Updated on: Mar 24, 2022 | 4:10 PM
Share

मुंबई : आपण नुकताच शहीद दिन साजरा केला.त्यानिमित्त ‘भारत माझा देश आहे’ (Bharat Majha Desh Ahe) या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. येत्या 6 मे रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. एबीसी क्रिएशन प्रस्तुत, डॉ. आशिष अग्रवाल (Ashish Agrawal) निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन पांडुरंग कृष्णा जाधव (Pandurang Jadhav) यांनी केलं आहे. या चित्रपटाच्या नावावरून आणि नुकत्याच झळकलेल्या टिझर पोस्टरवरून हा देशभक्तीपर चित्रपट असल्याचा लक्षात येतंय. मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला ‘लाडू’ म्हणजेच राजविरसिंह राजे गायकवाड (Ranveerraje Gaikwad) आणि देवांशी सावंत (Devika Sawant) या बालकलाकारांनी काम केलं आहे.

चित्रपटात मंगेश देसाई, शशांक शेंडे, छाया कदम, हेमांगी कवी, नम्रता साळोखे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. ‘भारत माझा देश आहे’ ची कथा पांडुरंग कृष्णा जाधव यांनीच लिहिली असून पटकथा, संवाद निशांत नाथाराम धापसे यांचे आहे.

समीर सामंत यांची गीते असलेल्या या चित्रपटाला अश्विन श्रीनिवास यांचे संगीत लाभले आहे. तर चित्रपटाचे संकलन निलेश गावंड यांनी केले आहे. ‘अहिंसा परमो धर्म:’ अशी टॅगलाईन असलेल्या या चित्रपटात आता काय पाहायला मिळणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शन पांडुरंग कृष्णा जाधव म्हणतात, ” हा एक देशभक्तीपर चित्रपट असला तरी त्याची कथा वेगळी आहे. मनाला स्तब्ध करणारा हा चित्रपट आहे. अनेक दिवसांपासून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करायची होती मात्र नुकत्याच झालेल्या शहीद दिनाच्या औचित्याने आम्ही ही तारीख जाहीर करत आहोत. कसलेले कलाकार असल्याने त्यांच्यासोबत काम करतानाही मजा आली. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट म्हणजे लहान मुलांसाठी पर्वणी आहे. प्रत्येक मुलाने पाहावा असा हा चित्रपट आहे.’’

संबंधित बातम्या

फोटोसाठी कायपण! प्रेग्नंट अभिनेत्रीने घातले हाय हिल्स; नेटकऱ्यांनी ट्रोल करताच म्हणाली..

Man Jhala Bajind मालिकेत बगाड यात्रा; रायाला मिळाला बगाड्याचा मान

“द काश्मीर फाईल्स’ सिनेमातून मिळालेल्या नफ्याचा काही टक्के भाग काश्मीरी पंडितांच्या पुनर्वसनासाठी द्या”, राष्ट्रवादीचं पंतप्रधान मोदी अधिकृत पत्र

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.