“द काश्मीर फाईल्स’ सिनेमातून मिळालेल्या नफ्याचा काही टक्के भाग काश्मीरी पंडितांच्या पुनर्वसनासाठी द्या”, राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचं पंतप्रधान मोदी अधिकृत पत्र

राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहित "द काश्मीर फाईल्स' सिनेमातून मिळालेल्या नफ्याचा काही टक्के भाग काश्मीरी पंडितांच्या पुनर्वसनासाठी द्या", अशी मागणी केली आहे.

द काश्मीर फाईल्स' सिनेमातून मिळालेल्या नफ्याचा काही टक्के भाग काश्मीरी पंडितांच्या पुनर्वसनासाठी द्या, राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचं पंतप्रधान मोदी अधिकृत पत्र
"द काश्मीर फाईल्स' सिनेमातून मिळालेल्या नफ्याचा काही टक्के भाग काश्मीरी पंडितांच्या पुनर्वसनासाठी द्या", राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
Follow us
| Updated on: Mar 24, 2022 | 5:12 PM

मुंबई : सध्या ‘द काश्मीर फाईल्स (The Kashmir Files) सिनेमा खूप चर्चेत आहे. नुकतंच या सिनेमाने कमाईचा 200 कोटींचा आकडा पार केलाय. “या सिनेमाच्या कमाईतील काही भाग काश्मीरी पंडितांची (Kashmiri Pandit) घरं बांधण्यासाठी द्या”, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी विधानसभेत (Maharashtra Assembly) बोलाताना म्हटलं. आता राष्ट्रवादीच्या वतीने थेट पंतप्रधान मोदी (PM Narendtra Modi) अधिकृत पत्र लिहीत ही मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी ही मागणी केली आहे. “द काश्मीर फाईल्स’ सिनेमातून मिळालेल्या नफ्याचा काही टक्के भाग काश्मीरी पंडितांच्या पुनर्वसनासाठी द्या”, अशी मागणी बाबासाहेब पाटील (Babasaheb Patil) यांनी पत्राच्या माध्यमातून केली आहे.

राष्ट्रवादीचं पंतप्रधानांना पत्र

राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहित “द काश्मीर फाईल्स’ सिनेमातून मिळालेल्या नफ्याचा काही टक्के भाग काश्मीरी पंडितांच्या पुनर्वसनासाठी द्या”, अशी मागणी केली आहे.

“आपण काश्मीर फाईल्स चित्रपट हा तसा आपण म्हणत आहात की सत्य परिस्थितीवर आधारीत आहे आणि यात काश्मिरी पंडित यांच्यावर अनन्वीत अत्याचार करुन त्यांना काश्मीर मधून बाहेर काढण्यात आले आहे. या चित्रपटाची प्रसिद्धी खुद्द आपण, भाजपचे खासदार, आमदार, सर्व मंत्री आणि एकूणच भाजप ची सर्व यंत्रणा या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी आणि तरुण लोकांनी जास्तीत जास्त हा चित्रपट पहावा यासाठी आवाहन करत आहे.नुकतंच या चित्रपटाने 200 कोटीहून अधिक जास्त गल्ला जमवला आहे. हि आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आपल्याला माहीत असेलच की 1990 साली काश्मीर पंडित विस्थापित झाले त्यावेळी आपल्या पक्षाने पाठिंबा दिलेले केंद्रात सरकार होते आणि काश्मीर मधील तत्कालीन राज्यपाल ही आपलेच होते. तरीही आपण काश्मीर पंडितांना काही मदत करू शकला नाहीत, मात्र आपण आपल्या मुलाखतीतून हे म्हणत आहात की काश्मीर पंडित यांसाठी काँग्रेसने काहीही केले नाही. जे काही केले ते भाजपने केले, तरी माझी आपल्याकडे मागणी आहे की त्यावेळी काही केले नाही मात्र आता आपण काश्मिर पंडितांना मदत करू शकता”, असं या पत्रात म्हणण्यात आलं आहे.

“जो काही या चित्रपटातून नफा मिळाला आहे तो लोकांनी पाहिलेल्या या चित्रपटामुळे मिळालेला आहे तरी या नफ्यातील काही टक्के भाग आपण कश्मीर पंडितांच्या पुनर्वसनासाठी (मुलांचे शिक्षण, त्यांची घरे, योग्य आरोग्य सुविधा तसेच त्यांचा दैनंदिन जीवनाचा दर्जा उंचावेल अशा सुविधांकरिता) द्यावा, अशी मागणी करत आहे. मला आशा की आपण या मागणीचा नक्की विचार कराल आणि काश्मिरी पंडितांविषयी असणारे आपले प्रेम फक्त चित्रपटातून न दाखवता प्रत्यक्ष कृतीतून दाखवाल. माझी ही मागणी आपण नक्कीच पूर्ण कराल ही मला खात्री आहे”, अशी मागणी राष्ट्रवादीच्यावतीने करण्यात आली आहे.

तसंच या सिनेमाचे निर्माते अभिषेक अग्रवाल आणि अभिनेत्री पल्लवी जोशी यांनाही राष्ट्रवादीच्या वतीने पत्र लिहिण्यात आलं आहे. त्यांच्याकडेही हीच मागणी करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

The Kashmir Files कोरोनानंतरचा ब्लॉकबस्टर चित्रपट; रोहित शेट्टीच्या ‘सूर्यवंशी’ला ही कमाईत टाकलं मागे

Huma Kureshi कडून ‘फ्री सोल’ फोटो शेअर, कमेंट बॉक्समध्ये नुसता जाळ!, पाहा हुमाचं नवी नजाकत…

अंकिता लोखंडेचा पती बनलाय घरजावई, 2 वर्षांपासून राहतोय तिच्यात घरी; नेमकं काय आहे कारण?

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.