Eknath Shinde: ‘याहून भारी ट्विस्ट फक्त..’, पहा देवेंद्र फडणवीसांच्या मास्टरस्ट्रोकनंतर मराठी कलाकारांनी लिहिलेली पोस्ट

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सरकार स्थापन होईल अशी जोरदार चर्चा कालपर्यंत रंगली होती. मात्र ऐनवेळी फडणवीसांना कथेत मोठा ट्विस्ट आणला. या ट्विस्टने सर्वांनाच अचंबित केलं. सोशल मीडियावर त्यावरून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण या विषयावर व्यक्त होऊ लागले.

Eknath Shinde: 'याहून भारी ट्विस्ट फक्त..', पहा देवेंद्र फडणवीसांच्या मास्टरस्ट्रोकनंतर मराठी कलाकारांनी लिहिलेली पोस्ट
देवेंद्र फडणवीसांच्या मास्टरस्ट्रोकनंतर मराठी कलाकारांनी लिहिलेली पोस्ट
Image Credit source: Twitter
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

Jun 30, 2022 | 6:27 PM

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत फडणवीसांनी शिंदे मुख्यमंत्री होतील अशी घोषणा केली आणि साऱ्यांच्या भुवया उंचावल्या. बुधवारी रात्री उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर गुरुवारी एकनाथ शिंदे गोव्याहून मुंबईला आले. फडणवीसांसोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सरकार स्थापन होईल अशी जोरदार चर्चा कालपर्यंत रंगली होती. मात्र ऐनवेळी फडणवीसांना कथेत मोठा ट्विस्ट आणला. या ट्विस्टने सर्वांनाच अचंबित केलं. सोशल मीडियावर त्यावरून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण या विषयावर व्यक्त होऊ लागले. राजकीय कथानक असलेल्या ‘धुरळा’ या मराठी चित्रपटाचा लेखक क्षितिज पटवर्धन (Kshitij Patwardhan) यानेसुद्धा सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे.

‘याहून भारी ट्विस्ट फक्त Shwashak Redemption’ मध्ये होता,’ अशी पोस्ट क्षितिजने लिहिली आहे. The Shwashak Redemption हा अमेरिकी चित्रपट आहे. ‘अगदी खरंय’ अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या पोस्टवर दिली. दुसरीकडे गेल्या दोन दिवसांपासून आपल्या एका व्हिडीओमुळे चर्चेत असलेले अभिनेते शरद पोंक्षे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहित एकनाथ शिंदेंना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथची शिंदे साहेबांचं अभिनंदन’, अशी पोस्ट त्यांनी लिहिली आहे. राज्यातील सत्तासंघर्षाबद्दल ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त होणारा अभिनेता आरोह वेलणकर यानेसुद्धा एकनाथ शिंदेंचं अभिनंदन केलंय. ‘सरप्राईज सरप्राईज.. वॉव, आपण याला राजकीय मास्टरस्ट्रोक म्हणू शकतो का? तुम्ही काय म्हणाल?’, असं लिहित त्याने ट्विटरवर पोल घेतला आहे.

क्षितिज पटवर्धन आणि शरद पोंक्षेंची पोस्ट

आरोहचे ट्विट्स-

2019 मध्ये महाविकास आघाडीच्या सरकारची चर्चा सुरू असताना फडणवीस आणि अजित पवार यांनी सत्तास्थापनेचा दावा करत शपथ घेतली. पण अवघ्या दीड दिवसात हे सरकार कोसळलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार आलं. आता शिवसेनेच्या काही नेत्यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील, असं म्हटलं जात होतं. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण खेळच पलटवला.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें