अशोक सराफ यांच्या वाढदिवसानिमित्त प्रेक्षकांना खास गिफ्ट! व्हॅक्यूम क्लीनरचा प्रयोग विनामूल्य बघायला मिळणार

अशोक सराफ यांच्या वाढदिवसानिमित्त आज अष्टविनायक नाट्यसंस्था यांच्यातर्फे सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. दादरच्या शिवाजी मंदिर येथे सकाळी 10.30 वाजता हा कार्यक्रम होणार असून व्हॅक्यूम क्लीनर या नाटकाचा प्रयोगही होणार आहे. विशेष म्हणजे अशोक सराफ यांचीही यामध्ये भूमिका आहे.

अशोक सराफ यांच्या वाढदिवसानिमित्त प्रेक्षकांना खास गिफ्ट! व्हॅक्यूम क्लीनरचा प्रयोग विनामूल्य बघायला मिळणार
Image Credit source: zee5.com
शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jun 04, 2022 | 9:12 AM

मुंबई : अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) 1960 पासून हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम करत आहेत. त्यांनी 1969 मध्ये ‘जानकी’ या मराठी चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. 45 वर्षांच्या कारकिर्दीत अशोक सराफ यांनी करण अर्जुन, सिंघम आणि इतर काही प्रसिद्ध बॉलिवूड (Bollywood) चित्रपटांसह 250 हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. आजही प्रेक्षकांना त्यांचे काही डाॅयलाॅग पाठ आहेत. 1987 मध्ये सचिन पिळगावकर दिग्दर्शित गंमत जम्मत या मराठी विनोदी चित्रपटात सराफ यांनी फाल्गुन वडके यांची व्यक्तीरेखा साकारली होती. हा चित्रपट हिट ठरला आणि अशोक सराफ यांच्या अभिनयाचे (Acting) सर्वत्र कौतुक करण्यात आले.

अष्टविनायक नाट्यसंस्था यांच्यातर्फे सत्कार

अशोक सराफ यांच्या वाढदिवसानिमित्त आज अष्टविनायक नाट्यसंस्था यांच्यातर्फे सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. दादरच्या शिवाजी मंदिर येथे सकाळी 10.30 वाजता हा कार्यक्रम होणार असून व्हॅक्यूम क्लीनर या नाटकाचा प्रयोगही होणार आहे. विशेष म्हणजे अशोक सराफ यांचीही यामध्ये भूमिका आहे. चिन्मय मांडलेकर यांनी या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. सत्कार सोहळा आणि नाटक बघायला प्रेक्षकांना कोणत्याही प्रकारचे शुल्क लागणार नाहीये. विनामूल्य प्रवेश सर्वांना देण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

यशस्वी कारकिर्दीची 50 वर्षे पूर्ण

अशोक सराफ मनोरंजन क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहेत. गेल्या वर्षी त्यांनी यशस्वी कारकिर्दीची 50 वर्षे पूर्ण केली आहेत. अशी हि बनवा बनवी या मराठी विनोदी चित्रपटात अशोक सराफ यांनी धनंजयची भूमिका साकारली होती. हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित 1966 च्या बॉलीवुड चित्रपट बीवी और मकानचा हा मराठी रिमेक होता. जोरू का गुलाम अशोक सराफ यांचा बॉलीवूड विनोदी चित्रपट ठरला. सीक्वेन्सने भरलेला होता हा चित्रपट हिट ठरला. शकील नुरानी दिग्दर्शित या चित्रपटात गोविंदा, ट्विंकल खन्ना आणि कादर खान मुख्य भूमिकेत होते.अशी हि बनवा बनवी

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें