AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MC Stan | क्या बोलती पब्लिक? ‘द कपिल शर्मा शो’मध्ये एमसी स्टॅनने लावला रॅपचा तडका; लाइक्सचा वर्षाव

4 आणि 5 मार्चच्या एपिसोडमध्ये एमसी स्टॅन आणि अब्दु रोझिक हे कपिल शर्माच्या शोमध्ये धमाल-मस्ती करताना दिसणार आहेत. कपिल शर्माने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या एपिसोडची एक झलक दाखवली आहे.

MC Stan | क्या बोलती पब्लिक? 'द कपिल शर्मा शो'मध्ये एमसी स्टॅनने लावला रॅपचा तडका; लाइक्सचा वर्षाव
MC Stan in The Kapil Sharma ShowImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 28, 2023 | 9:52 AM
Share

मुंबई : ‘बस्ती का हस्ती’ म्हणून लोकप्रिय झालेला ‘बिग बॉस 16’चा विजेता एमसी स्टॅनला आता विविध शोजचे ऑफर्स मिळू लागले आहेत. मार्च महिन्यात त्याचे एकानंतर एक रॅप शोजसुद्धा होणार आहेत. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर तो सक्सेस पार्टी आणि गेट-टुगेदरमध्ये दिसला. आता नुकतीच त्याने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी लावली. या शोमध्ये एमसी स्टॅनने त्याच्या रॅपचा तडका लावला. 4 आणि 5 मार्चच्या एपिसोडमध्ये एमसी स्टॅन आणि अब्दु रोझिक हे कपिल शर्माच्या शोमध्ये धमाल-मस्ती करताना दिसणार आहेत. कपिल शर्माने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या एपिसोडची एक झलक दाखवली आहे. या व्हिडीओमध्ये कपिलसुद्धा स्टॅनच्या रॅपवर थिरकताना दिसतोय.

कपिल शर्माने पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये एमसी स्टॅन त्याच्या 80 हजार रुपयांच्या शूजमध्ये आणि लाल रंगाच्या पोशाखात दिसत आहेत. स्टेजवर एमसी स्टॅन रॅप गातोय आणि त्या रॅपच्या तालावर कपिल शर्मा नाचताना दिसतोय. ‘क्या बोलती पब्लिक? वाइब है की नहीं? लव्ह यू ब्रो एमसी स्टॅन’, असं कॅप्शन देत कपिल शर्माने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

एमसी स्टॅनचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहतावर्ग आहे. याच क्रेझमुळे कपिल शर्माने व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर अवघ्या काही वेळातच त्याला लाखो लाइक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. गेल्या 15 तासांत या व्हिडीओला 12 दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर 27 लाख लाइक्सचा वर्षाव झाला आहे.

पहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

स्टॅन आणि कपिलचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहतेसुद्धा एपिसोड पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. ‘बस्ती का लडका सेलिब्रिटी बन गया’, असं एकाने लिहिलंय. तर ‘कपिल पाजीने विचार पण केला नसेल की इतके लाइक्स आणि कमेंट्स मिळतील’, असं दुसऱ्या युजरने म्हटलं आहे. ‘तीन तासांत 1.8 दशलक्ष लाइक्स’, असंही नेटकऱ्याने लिहिलं आहे. तर एसमी स्टॅनमुळे कपिलच्या शोची रेटिंग या आठवड्यात 1 नंबरवर असेल, असंही काहींनी म्हटलंय.

एमसी स्टॅनचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. गेल्या सहा महिन्यांत इन्स्टाग्रामवर त्याच्या फॉलोअर्सची संख्या जवळपास 400 टक्क्यांनी वाढली आहे. त्याचे फॉलोअर्स 1.8 दशलक्षांवरून 9.1 दशलक्षांवर गेले आहेत. बिग बॉस 16 जिंकल्यानंतर अवघ्या 48 तासांत जवळपास 20 ब्रँड्सनी करारासाठी एमसी स्टॅनशी संपर्क साधल्याचीही माहिती समोर येत आहे.

काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड
काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड.
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?.
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी.
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर.
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर.
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर.
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार.
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला.
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला.
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा.