.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मिलिंद गुणाजींच्या मुलाचं दिग्दर्शनात पदार्पण; अमित ठाकरेंच्या हस्ते मुहूर्ताचा पहिला क्लॅप

अभिनेते मिलिंद गुणाजी यांचा मुलगा अभिषेक गुणाजी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. नुकतंच त्याच्या पहिल्यावहिल्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली. अमित ठाकरे यांच्या हस्ते मुहूर्ताचा पहिला क्लॅप देण्यात आला.

मिलिंद गुणाजींच्या मुलाचं दिग्दर्शनात पदार्पण; अमित ठाकरेंच्या हस्ते मुहूर्ताचा पहिला क्लॅप
Abhishek Gunaji and Milind GunajiImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 09, 2023 | 4:51 PM
Share

मुंबई | 9 सप्टेंबर 2023 : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते मिलिंद गुणाजी यांचा मुलगा अभिषेक गुणाजीने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं आहे. त्याच्या पहिल्यावहिल्या ‘रावण कॉलिंग’ या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा नुकताच पार पडला. यावेळी अमित राज ठाकरे यांनी मुहूर्ताचा पहिला क्लॅप दिला. संदीप दंडवते, संदीप बंकेश्वर आणि अभिषेक गुणाजी यांची पटकथा असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिषेक गुणाजी आणि संदीप बंकेश्वर यांनी केलं आहे. तर या चित्रपटाची सहाय्यक पटकथा आणि संवाद सचिन दरेकर यांचे आहेत. ‘रावण कॉलिंग’मध्ये सचित पाटील, पूजा सावंत, वंदना गुप्ते, गौरव घाटणेकर, रवी काळे, बिपीन नाडकर्णी, राजू शिसाटकर, सोनाली कुलकर्णी आणि मिलिंद गुणाजी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अभिषेक गुणाजी म्हणाला, ” यापूर्वी मी दिग्दर्शक सतीश राजवाडे यांच्या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. मात्र स्वतंत्र दिग्दर्शनाच्या कारकिर्दीतील हा माझा पहिला चित्रपट आहे, त्यामुळे उत्सुकता तर आहेच पण तितकंच दडपणही आहे. मुळात माझ्या नावाशी दोन मोठी नावं जोडली गेली आहेत. त्यामुळे माझ्यावर जबाबदारीही तितकीच आहे. माझ्या प्रोजेक्टला शंभर टक्के न्याय देण्याचा माझा पूर्ण प्रयत्न असेल या चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात नुकतीच मुंबईमध्ये झाली असून लवकरच ‘रावण कॉलिंग’ प्रेक्षकांच्या भेटीला येईल . सध्या तरी चित्रपटाबद्दल काहीच सांगू शकत नसलो तरी ‘रावण कॉलिंग’ अनेक ट्विस्टने भरलेला असेल. सगळेच कलाकार उत्तम आहेत. मला आशा आहे, जसं प्रेम तुम्ही माझ्या आई वडिलांना दिलं तसंच प्रेम माझ्या पहिल्या चित्रपटालाही मिळेल.”

तर दिग्दर्शक संदीप बंकेश्वर म्हणाले, ” चित्रपटाचा विषय खूप वेगळा आहे. मला आनंद या गोष्टीचा आहे की, ‘रावण कॉलिंग’च्या निमित्ताने मी अनेक नामवंत कलाकारांशी जोडलो गेलो आहे. या सगळ्याच कलाकारांची अभिनयाची एक विशिष्ट शैली आहे. त्यांच्यासोबत काम करताना मजा येणार हे नक्की. अभिषेकही कामाच्या बाबतीत अतिशय शिस्तप्रिय आहे. त्याच्या वडिलांचे आज बॉलिवूड, मराठी इंडस्ट्रीमध्ये मोठे नाव आहे. परंतु कामाच्या बाबतीत त्यांचे नाते दिग्दर्शक – कलाकाराचेच आहे.”

Follow Us
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर