Mukesh Ambani: प्रायव्हेट विमान भव्य घर… ‘या’ ८ महागड्या गोष्टींचे मालक आहेत मुकेश अंबानी

मुकेश अंबानी यांच्या घरात असलेल्या भाड्यांना सोन्याची किनार, भांड्यांसाठी मोजली एवढी मोठी रक्कम, अंबानी कुटुंबातील अत्यंत महागड्या वस्तू... जाणून व्हाल हैराण

Mukesh Ambani: प्रायव्हेट विमान भव्य घर... 'या' ८ महागड्या गोष्टींचे मालक आहेत मुकेश अंबानी
Follow us
| Updated on: Apr 17, 2023 | 11:30 AM

मुंबई : जगातील प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी, पत्नी नीता अंबानी आणि अंबानी कुटुंबाची चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगलेली असते. अंबानी कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अंबानी कुटुंबातील महिलांकडे असणाऱ्या महागड्या वस्तूंची कायम सर्वत्र चर्चा रंगलेली असते. आता मुकेश अंबानी यांच्याकडे असणाऱ्या महागड्या वस्तूंची तुफान चर्चा रंगत आहे. मुकेश अंबाना जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. फोर्ब्सच्या यादीनुसार त्यांची एकून संपत्ती जवळपास ८४.७ कोटी रुपये आहे. मुकेश अंबानी यांच्याकडे भव्य घर, प्रायव्हेट जेट यांसारख्या अनेक महागड्या वस्तू आहेत. जगातील १३ व्या सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्याकडे आलिशान घर आहे, जे आशियातील सर्वात महागडं घर आहे.

मुकेश अंबानी आणि त्यांचं कुटुंब मुंबईत असलेल्या अँटिलियामध्ये राहतं. अँटिलियाची किंमत १५,००० कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं. अँटिलिया २७ मजली इमारत असून ती ६ लाख चौरस मीटरमध्ये पसरलेली आहे. अँटिलियामध्ये सर्वप्रकारच्या सुखसुविधा आहेत. अँटिलियाची चर्चा देखील चाहत्यांमध्ये रंगलेली असते.

मुकेश अंबानी यांच्याकडे आयपीएलची मुंबई इंडियन्स टीम देखील आहे. मुंबई इंडियन्स टीम मुकेश अंबानी यांनी २००८ मध्ये तब्बल ८५०व कोटी रुपयांमध्ये खेरदी केली. एवढंच नाही तर, मुकेश अंबानी यांच्याजवळ स्टोक पार्क हे ब्रिटनमधील प्रसिद्ध कंट्री क्लब आणि लक्झरी गोल्फ रिसॉर्ट आहे. या दोन महागड्या गोष्टी मुकेश अंबानी यांनी ५९२ कोटी रुपयांना विकत घेतल्या.

हे सुद्धा वाचा

मुकेश अंबानी यांच्याकडे एक बोइंग बिझनेस जेट आहे. ज्याची किंमत ५.९ अरब रुपये आहे. शिवाय २४० कोटी किमतीचे ‘Airbus A319’ आणि ३३ कोटी किमतीचे ‘Falcon 900EX’ सारखे आधुनिक जेट देखील अंबानी यांच्याकडे आहेत.

मुकेश अंबानी यांच्याकडे अनेक महागड्या गाड्या देखील आहेत . त्यांच्याकडे Rolls Royce Cullinan कार आहे. या कारची किंमत १३ कोटी रुपये आहे. शिवाय मुकेश अंबानी यांच्याकडे BMW 760Li कार देखील आहे. त्यांच्या या कारची किंमत ८.५० कोटी रुपये आहे. अंबानी कुटुंबातील महागड्या वस्तू कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असतात.

नीता अंबानी देखील त्यांच्या महागड्या वस्तूंमुळे कायम चर्चेत असतात. नीता अंबानी यांनी श्रीलंकेतून 25,000 भांड्यांचा सेट खरेदी केला. या पोर्सिलेन क्रॉकरी सेटमध्ये २२-कॅरेट सोने आणि प्लॅटिनमची किनार आहे. या भांड्यांची किंमत सुमारे १.५ कोटी रुपये आहे.

जगातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांचं खेळण्याचं दुकान देखील आहे. जगातील सर्वात जुनं असलेलं Hamleys हे खेळण्याचं दुकान अंबानी यांनी 2019 मध्ये अंबानींनी ६२० कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. Hamleys या खेळण्याच्या दुकानाची स्थापना १७६० साली झाली. त्याची देशभरात 88 दुकाने आहेत आणि ५०,००० प्रकारची खेळणी विकली गेली आहेत.

Non Stop LIVE Update
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका.
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी.
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना.
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती.
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ.
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी.
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले...
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले....
'यूज अँड थ्रो' ही भाजपाची प्रवृत्ती, रोहित पवारांचा थेट हल्लाबोल
'यूज अँड थ्रो' ही भाजपाची प्रवृत्ती, रोहित पवारांचा थेट हल्लाबोल.
केतकी चितळेसारखा आवाज उठवावा; VHP नं मांडली रोखठोक भूमिका, प्रकरण काय?
केतकी चितळेसारखा आवाज उठवावा; VHP नं मांडली रोखठोक भूमिका, प्रकरण काय?.
सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? दादा म्हणाले
सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? दादा म्हणाले.