AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“ती माझ्या मनातील पोकळी..”; होणाऱ्या दुसऱ्या पत्नीबद्दल नाग चैतन्यकडून भावना व्यक्त

अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचा पूर्व पती आणि दाक्षिणात्य अभिनेता नाग चैतन्य दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकण्यासाठी सज्ज झाला आहे. ऑगस्ट महिन्यात त्याने गर्लफ्रेंड सोभिता धुलिपालाशी साखरपुडा केला होता.

ती माझ्या मनातील पोकळी..; होणाऱ्या दुसऱ्या पत्नीबद्दल नाग चैतन्यकडून भावना व्यक्त
Sobhita Dhulipala and Naga ChaitanyaImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 25, 2024 | 3:32 PM
Share

दाक्षिणात्य अभिनेता आणि समंथा रुथ प्रभूचा पूर्व पती नाग चैतन्य लवकरच दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार आहे. अभिनेत्री सोभिता धुलिपालाशी तो डिसेंबरमध्ये लग्न करणार आहे. काही दिवसांपूर्वीच या दोघांचा साखरपुडा पार पडला होता. नाग चैतन्य आणि सोभिता त्यांच्या डेटिंग लाइफबद्दल कधी मोकळेपणे व्यक्त झाले नव्हते. मात्र आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नाग चैतन्यने सोभिताबद्दलच्या भावना उघडपणे व्यक्त केल्या आहेत. याआधी नाग चैतन्यने समंथाशी लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या चार वर्षांतच त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 2021 मध्ये समंथा आणि नाग चैतन्यने घटस्फोट घेतला.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत नाग चैतन्यने सोभिताबद्दलचं प्रेम व्यक्त केलं. “सोभितासोबत आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात करण्यास आणि आयुष्य एकत्र साजरं करण्यासाठी मी फार उत्सुक आहे. माझं तिच्याशी कनेक्शन खूप घट्ट आहे. ती मला खूप चांगल्याप्रकारे समजून घेते आणि ती माझ्या मनातील पोकळी भरून काढते. आमचा हा पुढचा प्रवास खूपच अप्रतिम असेल”, असं तो म्हणाला.

View this post on Instagram

A post shared by Sobhita (@sobhitad)

पुढे लग्नाच्या प्लॅनविषयी त्याने सांगितलं, “अर्थातच लग्नासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. पोटात आनंदाच्या गुदगुल्या होत आहेत.. पण फार नाही (हसतो). गुदगुल्या या कारणासाठी कारण लग्नाच्या दिवसांत बरीच प्लॅनिंग असते. बऱ्याच गोष्टींचं आयोजन करावं लागतं. हैदराबादमधील अन्नपूर्णा स्टुडिओजमध्ये आमचं लग्न पार पडणार आहे. या जागेशी माझ्या भावना जोडलेल्या आहेत. आमच्या कुटुंबीयांनी याबाबत खूप विचारपूर्वक निर्णय घेतला आहे. माझ्या आजोबांच्या पुतळ्यासमोर आमचं लग्न पार पडणार आहे. त्यामुळे त्यांचाही आशीर्वाद आम्हाला मिळेल, असा विश्वास आहे. आमचे कुटुंबीयसुद्धा खूप खुश आहेत.”

नाग चैतन्य आणि सोभिता हे लग्नाआधी दोन वर्षांपर्यंत एकमेकांना डेट करत होते. डेटिंगदरम्यान दोघांचे बरेच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र त्यावेळी दोघांनी कधीच प्रेमाची जाहीर कबुली दिली नव्हती. दोघांनी थेट साखरपुड्याचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना लग्नाविषयीची माहिती दिली. या दोघांच्या लग्नाला मोजके पाहुणे उपस्थित राहणार आहेत. नागार्जुन यांनी सोभिताला जेव्हा त्यांच्या घरी चहासाठी बोलावलं होतं, तेव्हाच नाग चैतन्यची तिच्याशी पहिल्यांदा भेट झाली होती. त्यामुळे सोभिता आणि नाग चैतन्यला एकत्र आणण्यात नागार्जुन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.