AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाग चैतन्यच्या दुसऱ्या लग्नाची पत्रिका व्हायरल; या दिवशी अडकणार लग्नबंधनात

अभिनेता नाग चैतन्य आणि सोभिता धुलिपाला लवकरच लग्नबंधनात अडकणार असून त्यांची लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पत्रिकेवर लग्नाची तारीख पहायला मिळतेय. नाग चैतन्यचं हे दुसरं लग्न असून याआधी त्याने अभिनेत्री समंथाशी लग्नगाठ बांधली होती.

| Updated on: Nov 17, 2024 | 2:09 PM
Share
अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचा पूर्व पती आणि दाक्षिणात्य अभिनेता नाग चैतन्य दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकण्यासाठी सज्ज झाला आहे. ऑगस्ट महिन्यात त्याने गर्लफ्रेंड सोभिता धुलिपालाशी साखरपुडा केला होता. तेव्हापासूनच या दोघांच्या लग्नाच्या तारखेविषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. अखेर ही तारीख समोर आली आहे.

1 / 5
नाग चैतन्य आणि सोभिता यांच्या ल्गनाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या पत्रिकेवरील लग्नाची तारीख स्पष्ट पहायला मिळतेय. सोभिता आणि नाग चैतन्य येत्या 4 डिसेंबर रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत.

नाग चैतन्य आणि सोभिता यांच्या ल्गनाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या पत्रिकेवरील लग्नाची तारीख स्पष्ट पहायला मिळतेय. सोभिता आणि नाग चैतन्य येत्या 4 डिसेंबर रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत.

2 / 5
लग्नाच्या पत्रिकेसोबतच हँपरचाही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात लग्नपत्रिका आणि पाहुण्यांसाठी विविध भेटवस्तूंचा समावेश आहे. नाग चैतन्यचं हे दुसरं लग्न आहे. याआधी त्याने अभिनेत्री समंथा रुथ प्रभूशी लग्न केलं होतं. मात्र या दोघांचं लग्न फक्त चार वर्षेच टिकलं.

3 / 5
मुलाच्या साखरपुड्याविषयी नाग चैतन्यचे वडील नागार्जुन एका मुलाखतीत म्हणाले, “नाग चैतन्यला पुन्हा त्याचा आनंद मिळाला. तो खूप खुश आहे आणि त्याला पाहून मीसुद्धा खुश आहे. त्याच्यासाठी आणि आमच्या कुटुंबीयांसाठी मागचा काही काळ ठीक नव्हता. समंथासोबत विभक्त झाल्यानंतर तो खूप निराश झाला होता."

4 / 5
"माझा मुलगा दाखवत नाही, पण मला माहीत होतं की तो नाखुश आहे. सोभिता आणि त्याची जोडी चांगली आहे. ते दोघं एकमेकांवर खूप प्रेम करतात. साखरपुड्याला फक्त सोभिताचे आईवडील आणि बहीण, नाग चैतन्यची आई, माझी पत्नी अमला आणि मी उपस्थित होतो”, असंही त्यांनी सांगितलं होतं.

5 / 5
Follow Us
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
Raj Thackeray : Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि संविधान.....
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?