तशीच दाढी, मिशा आणि हेअरस्टाईलही… नाना पाटेकर यांचा रफ अँड टफ पर्सनॅलिटी असलेला मुलगा पाहिला का?
नाना पाटेकर यांचा मुलगा मल्हार सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तो नानांसारखा दिसतो आणि त्याचा साधा स्वभाव प्रेक्षकांना आवडतो. मल्हारने कॉमर्सची पदवी घेतली असून त्याला सिनेमात काम करायची इच्छा होती. पण नानांनी त्याला एका चित्रपटात काम करण्यास मनाई केली.

अभिनेते नाना पाटेकर नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी त्यांचा राग, कधी त्यांचे प्रेरणा देणारे सल्ले, त्यांची शेती, गावाकडे राहणं, शेतकऱ्यांच्या विधवांसाठी करण्यात येणार काम आणि राजकारण्यांना अंगावर घेणं… या कोणत्या ना कोणत्या कारणाने नाना चर्चेत असतात. सध्या मात्र नाना वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. तेही त्यांच्या मुलामुळे. त्यांच्या मुलाचं नाव मल्हार पाटेकर आहे. मल्हार हुबेहूब नाना सारखा दिसतो. त्यामुळेच सोशल मीडियावर सध्या मल्हारच्या नावाची चर्चा आहे.
मल्हारचा लूक हुबेहूब नाना पाटेकर यांच्यासारखा आहे. तशीच दाढी, मिशा आणि हेअरस्टाईल मल्हारची आहे. विशेष म्हणजे केवळ दिसणंच नाही तर मल्हारलाही नानांसारखं साधं राहायला आवडतं. सुपरस्टारचा मुलगा असूनही मल्हारचा कोणताच बडेजाव नसतो. अत्यंत साध्या पद्धतीने मल्हार राहतो. त्याच्या या साध्या स्वभावावर आणि रफ अँड टफ स्टाईलवर त्याचे चाहते बेहद खूश झाले आहेत. त्यामुळेच सध्या मल्हार सोशल मीडिया सेन्सेशन झाला आहे.
अन् पहिला सिनेमा हातून गेला
मल्हारने मुंबईतील सरस्वती मंदिर हायस्कूलमधून शिक्षण घेतलं आहे. त्याने कॉमर्सची पदवी घेतली आहे. मल्हारलाही लहानपणापासून सिनेमात काम करण्याची आवड आहे. तो प्रकाश झा यांच्या सिनेमात काम करणारही होता. पण त्याचेवळी नाना पाटेकर आणि प्रकाश झा यांचं वाजलं. नानाने मल्हारला प्रकाश झा यांच्या सिनेमात काम करण्यास मनाई केली आणि त्यामुळे मल्हारचं अभिनेता बनण्याचं स्वप्न मागे पडलं.
पुन्हा श्रीगणेशा
नंतर मल्हारने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून राम गोपाल वर्मा यांच्या द अटॅक ऑफ 26\11 या सिनेमात काम केलं. मल्हारचं स्वत:चं प्रॉडक्शन हाऊस आहे. त्याने वडील नाना पाटेकर यांच्या नावानेच प्रोडक्शन हाऊस सुरू केलं आहे. नाना साहेब प्रोडक्शन हाऊस असं त्याच्या प्रोडक्शन हाऊसचं नाव आहे.

आईशी क्लोज
नाना पाटेकर आणि त्यांची पत्नी निलकांती यांनी अजून घटस्फोट घेतलेला नाही. पण बऱ्याच कालावधीपासून दोघेही वेगळे राहतात. मल्हार हा आईशी अधिक क्लोज आहे. मल्हारला एक मोठा भाऊही होता. पण त्याचा अकाली मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूचा नाना यांना मोठा धक्का बसला होता. मुलगा गेल्यानंतर ते बराच काळ अस्वस्थ होते. पण मल्हारचा जन्म झाला आणि नाना या दु:खातून सावरले होते.

