Naseeruddin Shah | नसीरुद्दीन शाह यांनी सांगितले बाॅलिवूडमधील कटू सत्य, थेट म्हणाले, मेहनत करणाऱ्यांना कधीच…
बाॅलिवूड अभिनेते नसीरुद्दीन शाह हे नेहमीच चर्चेत असतात. नसीरुद्दीन शाह यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट भूमिका या चित्रपटांमध्ये केल्या आहेत. नसीरुद्दीन शाह यांची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. नसीरुद्दीन शाह हे नेहमीच त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतात.

मुंबई : बाॅलिवूड अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) हे नेहमीच चर्चेत असतात. नसीरुद्दीन शाह यांनी काही दिवसांपूर्वीच मोठा खुलासा करत मिळणाऱ्या पुरस्कारांबद्दल धक्कादायक वक्तव्य हे केले होते. यानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला होता. बाॅलिवूडमध्ये कधीच तुमच्या कामाबद्दल तुम्हाला पुरस्कार (Award) हा मिळत नसल्याचे त्यांनी म्हटले होते. इतकेच नाही तर चित्रपटासाठी मिळणारा पुरस्कार हा फक्त आणि फक्त लॉबिंगचा परिणाम असल्याचे देखील त्यांनी म्हटले होते आणि यामुळेच मी आता शक्यतो पुरस्कार स्वीकारण्यासाठी जात नसल्याचे देखील त्यांनी म्हटले होते. यानंतर मोठा वाद (Big controversy) हा निर्माण झाला.
आता नुकताच एका कार्यक्रमामध्ये बोलताना देखील नसीरुद्दीन शाह यांनी मोठा खुलासा केला आहे. नसीरुद्दीन शाह यांनी बाॅलिवूडलाच घरचा आहेर दिल्याचे बघायला मिळत आहे. नसीरुद्दीन शाह हे म्हणाले की, बाॅलिवूडमध्ये असूनही असा एक वर्ग आहे, त्याला त्याच्या कामाचा योग्य तो मोबदला अजिबातच मिळत नाही.
दुसरीकडे पंख्याखाली राहून ज्यूस वगैरे घेणाऱ्यांना त्यापेक्षा अधिक पैसे हे मिळतात. एक टक्का देखील त्यांच्या मानधनातील या वर्गाला पैसे मिळत नाहीत. विशेष म्हणजे हे गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेले आहे आणि यावर कोणीही भाष्य करत नाही. हा वर्ग गुडघ्याभर पाण्यामध्ये उभे राहून काम करतो.
इतकेच नाही तर कितीतरी वजन खांद्यावर उचलून हे काम करतात. मात्र, त्यांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला कधीच मिळालेला नाही. मात्र, दुसरीकडे एका व्यक्तीवर कोट्यावधी रूपये खर्च केले जातात ही वस्तू स्थिती आहे. पैसे तर सोडाच यांना यांच्या कामामुळे कोणताही पुरस्कार देखील मिळत नाही.
एखादा चित्रपट जरी हिट झाला तरीही त्यांचे साधे काैतुक देखील केले जात नाही. विशेष म्हणजे आता नसीरुद्दीन शाह यांच्या बोलण्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. इतकेच नाही तर अनेकांनी नसीरुद्दीन शाह हे योग्यच बोलत असल्याचे देखील म्हटले आहे. नसीरुद्दीन शाह यांनी एका मोठ्या विषयाला हात नक्कीच घातला आहे.
