AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“मुस्लिमांचं लक्ष सानिया मिर्झाचा स्कर्ट, हिजाबवर..”; नसीरुद्दीन शाह यांचं परखड मत

अभिनेते नसीरुद्दीन शाह हे विविध मुद्द्यांवर बेधडकपणे त्यांची मतं मांडतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते मुस्लिमांबद्दल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल व्यक्त झाले. मुस्लिमांचं लक्ष नेहमीच चुकीच्या गोष्टींवर असल्याचं ते म्हणाले.

मुस्लिमांचं लक्ष सानिया मिर्झाचा स्कर्ट, हिजाबवर..; नसीरुद्दीन शाह यांचं परखड मत
नसीरुद्दीन शाहImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 13, 2024 | 8:39 AM
Share

ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह हे त्यांच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर ते मोकळेपणे व्यक्त होतात. मात्र यामुळे अनेकदा त्यांना ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यावर व्यक्त झाले. नसीरुद्दीन म्हणाले की नरेंद्र मोदी असे पहिले नेते नाहीत जे मुस्लिमांविरोधात बोलत असतील. हे आधीपासूनच चालत आलं आहे. तर दुसरीकडे त्यांनी मुस्लिमांच्याही काही चुका बोलून दाखवल्या. “मुस्लिमांचं लक्ष नेहमी चुकीच्या गोष्टींवर असतं. ते शिक्षणाऐवजी सानिया मिर्झाच्या स्कर्टच्या लांबीकडे अधिक लक्ष देतात. चूक मुस्लिमांची आहे आणि त्यांनी आता डोळे उघडले पाहिजेत”, असं परखड मत त्यांनी मांडलं. या मुलाखतीत ते लोकसभा निवडणुकांचा निकाल आणि हिंदू-मुस्लिम राजकारणावरही बोलले.

मोदींबद्दल काय म्हणाले?

‘द वायर’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “आपण सर्वांनी हा विचार करायला हवा की गोष्टी कशा ठीक होऊ शकतात. आपल्या सर्वांसाठी मोदींना विरोध करणं खूप सोपं आहे. देशात जे काही चुकीचं घडतंय, त्यासाठी मोदींना दोष देणं सोपं आहे. पण सत्य हे आहे की मोदी सत्तेत येण्याच्या आधीपासूनच देशात बरंच काही वाईट घडतंय. मोदींनी फक्त त्या चुकीच्या गोष्टींना स्पर्श केला, ज्या खूप आधीपासूनच दडलेल्या होत्या. मला आठवतंय की लहानपणी मला मुस्लीम असल्याने टोमणा मारला जायचा. त्यावेळी मीसुद्धा दुसऱ्या धर्मावर टिप्पणी करायचो. माझ्या मते या गोष्टी खूप आधीपासूनच आहेत. मोदी खूप चलाख आहेत की त्यांनी या गोष्टींना पुन्हा छेडलं.”

मुस्लिमांबद्दल काय म्हणाले नसीरुद्दीन?

या मुलाखतीत त्यांनी मुस्लिमांच्या चुका सांगितल्या. “सत्य हेच आहे की मुस्लीमसुद्धा पवित्र-स्वच्छ नाहीत. मुस्लिमांनी नेहमीच चुकीच्या गोष्टींकडे लक्ष दिलं. त्यांनी हिजाब, सानिया मिर्झाच्या स्कर्टची लांबी या गोष्टींवर लक्ष केंद्रीत केलं. खरंतर त्यांनी शिक्षण आणि आपल्या समुदायाचं ज्ञान कसं वाढवता येईल, याकडे लक्ष द्यायला हवं होतं. जेव्हा मॉडर्न गोष्टी शिकवायच्या होत्या, तेव्हा मदरसांमध्ये ढकलण्याचं काम केलं. आता पुरे झालं, मुस्लिमांनी आता तरी डोळे उघडायला हवेत”, अशी भूमिका त्यांनी मांडली.

मुस्लिमविरोधी टिप्पण्यांवर नसीरुद्दीन पुढे म्हणाले, “असं करणारे ते काही पहिले नेते नाहीत. ते फक्त मोक्याच्या क्षणी आले. मुस्लीम लीगच्या उत्तरात हिंदू महासभा 1915 साली बनली होती. दोन बंगाली लोकांनी, मला त्यांची नावं आठवत नाहीत, पण त्यांनी 2 नेशन थिअरीबद्दल बोलण्यास सुरुवात केली होती. मोदी हे एका परंपरेवर चालत आहेत, जी बऱ्याच नेत्यांनी याआधी सुरू केली होती. योगी आदित्यनाथ आजसुद्धा म्हणतात की हिंदू-मुस्लीम एकत्र राहू शकत नाही.”

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.