AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘पारू’ अचानक बंद झाल्यानंतर अहिल्यादेवी किर्लोस्कर – श्रीकांत किर्लोस्कर बनले ‘धुरंधर’; चाहते उत्सुक

'पारू' या मालिकेनं अचानक प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यानंतर या मालिकेत अहिल्यादेवी किर्लोस्कर आणि श्रीकांत किर्लोस्कर यांची भूमिका साकारलेले कलाकार आता एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

'पारू' अचानक बंद झाल्यानंतर अहिल्यादेवी किर्लोस्कर - श्रीकांत किर्लोस्कर बनले 'धुरंधर'; चाहते उत्सुक
विजय पटवर्धन-मुग्धा कर्णिक आणि शरयू सोनावणेImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 03, 2026 | 12:39 PM
Share

शरयू सोनावणे आणि प्रसाद जवादे यांच्या मुख्य भूमिका असलेली ‘पारू’ ही मालिका अचानक बंद झाली. फेब्रुवारी महिन्यात या मालिकेचा शेवटचा एपिसोड प्रसारित झाला होता. तेव्हा कोणालाच कल्पना नव्हती की, ही मालिका बंद होत आहे. या मालिकेत पारूची मुख्य भूमिका साकारलेली अभिनेत्री शरयू सोनावणे हिने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली होती. त्यानंतर आता मालिकेत अहिल्यादेवी किर्लोस्कर आणि श्रीकांत किर्लोस्कर यांची भूमिका साकारलेल्या कलाकारांची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे. विजय पटवर्धन आणि मुग्धा कर्णिक हे नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

विजय पटवर्धन यांची पोस्ट-

‘झी मराठीवरील पारू ही मालिका अत्यंत गाजली. त्या मालिकेतील पात्रं जणू काही तुमच्या घरातलीच जिवाभावाची माणसं झाली होती. त्यांची सुखदुःखं तुम्ही जवळून बघितली. अहिल्यादेवी किर्लोस्कर आणि श्रीकांत किर्लोस्कर या आदित्यच्या आईवडिलांना आणि पारूच्या सासूसासऱ्यांना तुम्ही भरभरुन प्रेम दिलं, आशीर्वाद दिले. दुर्देवाने ती मालिका संपली. कशी? का? कारणं काय? याच्याकडे थोडं दुर्लक्ष करुया. जे होतं ते चांगल्यासाठी म्हणूया आणि सर्वांचं सगळं चांगलं होऊ द्या अशी प्रार्थना करून नव्याने सुरुवात करु. कारण, अहिल्यादेवी किर्लोस्कर आणि श्रीकांत किर्लोस्कर येत आहेत नव्या रूपात सौ. आशालता अनंत जोशी आणि श्री अनंत माधव जोशी उर्फ धुरंधर बनून,’ अशी आनंदाची बातमी त्यांनी चाहत्यांना दिली.

याविषयी त्यांनी पुढे लिहिलं, ‘ते गेले आहेत त्यांच्या मुलीबरोबर ट्विंकल बरोबर, परदेशात सुट्टी एंजॉय करायला. ते कुठल्या देशात गेले आहेत? तिथे त्यांना कोण माणसं भेटतात? ही सुट्टी ते कशी एंजॉय करतात? हे पहायला मिळणार आहे, सवाई गंधर्व निर्मित, अभिजात प्रकाशित, भरत दाभोळकर लिखित आणि दिग्दर्शित, ‘कॅरी ऑन स्पायगिरी’ या घराच्या दिवाणखान्याच्या चौकटीतून बाहेर आलेल्या जबरदस्त नाटकात. तर भेटूया नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगाला. शुक्रवार 10 एप्रिल दुपारी 3.30 वाजता श्री शिवाजी मंदिर, दादर इथं.’

भरत दाभोळकर स्वतःचं मूळ इंग्रजी नाटक मराठीत घेऊन येत आहेत. यापूर्वी इंग्रजीत हे नाटक विजू खोटे, किशोर प्रधान, विहंग नायक, वृषाली गोखले, अतुल परचुरे, अतुल काळे यांसारख्या दिग्गज कलाकारांनी अजरामर केलं होतं. आता हेच नाटक मराठीत आणण्याचं धाडस निर्माते आकाश भडसावळे यांनी केलं आहे. मूळ इंग्रजी नाटकात एक गुजराती कुटुंब दाखवण्यात आलं होतं, मात्र मराठी प्रेक्षकांची नस ओळखून लेखनात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. नाटकाचा मूळ गाभा तोच ठेवून संपूर्ण नाटक आता ‘मराठमोळ्या’ पद्धतीने सादर होणार आहे.

Follow Us
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची...
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची....
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा.
NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी
NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी.
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच..
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच...
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात.
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना..
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन.
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो.