अमिताभ बच्चनवर या बॉलिवूड अभिनेत्रीने केला होता अपहरणाचा गंभीर आरोप; केली होती पोलीस तक्रार
अशी एक अभिनेत्री जिने तिच्या अभिनयानेच नाही तर तिच्या सौंदर्यांनेही प्रेक्षकांना घायाळ केले होते. त्या अभिनेत्रीने अमिताभ बच्चन यांच्या फार गंभीर आरोप केले होते. अमिताभ तिला मारण्याचा प्रयत्न करत असल्याचे अनेक गंभीर आरोप तिने केले होते. तसेच पोलिसांत तक्रार देखील केली होती.

जेव्हा जेव्हा अमिताभ बच्चन यांच्या जुन्या चित्रपटांची चर्चा होते तेव्हा सर्वात आधी रेखाचे नाव समोर येते. कारण फक्त चित्रपटच नाही तर वैयक्तिक आयुष्यातील काही घटना या रेखाशी जोडलेल्या आहेत. त्यांच्या अफेअरच्या चर्चा आजही चर्चेत असतात. पण रेखा व्यतिरिक्त त्यांचे नाव इतर अभिनेत्रींशीही जोडले गेले होते. यापैकी एक नाव म्हणजे बोल्ड अभिनेत्री जिने अमिताभ यांच्यावर तिला मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप लावला होता. त्यांनी केलेले हो आरोपांची प्रचंड चर्चा झालेली.
70-80 मधील सर्वात सुंदर आणि बोल्ड अभिनेत्री
ही अभिनेत्री म्हणजे 70-80 मधील सर्वात सुंदर आणि बोल्ड अभिनेत्री म्हणजे परवीन बॉबी. पण जेव्हा परवीनने अमिताभ यांच्यावर तिचे अपहरण आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. अमिताभ आणि परवीन यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीचे खूप कौतुक झाले. त्यांचा अफेरच्या चर्चा देखील येऊ लागल्या होत्या. अमिताभ अनेकदा परवीन बॉबीच्या घरी येत जात असायचे असेही म्हटले जाते. एका मुलाखतीत परवीनने अमिताभचे कौतुक केले होते आणि म्हटलं होतं की, ती तिच्या आयुष्यात अमिताभपासून सर्वात जास्त प्रभावित झाली. हळूहळू, त्यांच्या अफेअरच्या कथा सार्वजनिक होऊ लागल्याने,त्यानंतर अमिताभने परवीनपासून स्वतःला दूर केले.
“अमिताभ एक इंटरनॅशनल गुंड आहे”
अमिताभच्या जाण्याने परवीनला खूप धक्का बसला. त्यानंतर तिचे एक धक्कादायक विधान समोर येऊ लागले. तिने अमिताभवर तिला मारण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. परवीनने म्हटले होते की, “अमिताभ एक इंटरनॅशनल गुंड आहे, तो मला ठार मारण्याच्या मागे लागला आहे. तो मला मारू इच्छितो. त्याच्या गुंडांनी माझे अपहरण केले आणि मला एका बेटावर ठेवले होते. तिथे गुंडांनी माझी शस्त्रक्रिया केली आणि माझ्या कानाखाली एक चिप आणि ट्रान्समीटरसारखी वस्तू बसवली.” असे अनेक धक्कादायक वक्तव्य समोर येऊ लागली.
- Parveen Babi and Amitabh Bachchan
अंगावर झुंबर पाडून मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
परवीनने अमिताभवर असाही आरोप केला की एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अमिताभने तिच्यावर झुंबर पाडून तिला मारण्याचा प्रयत्न केला. हा चित्रपट शान होता, ज्याचे गाणे चित्रित केले जात होते. त्यानंतर परवीन बॉबीने ओरडायला सुरुवात केली आणि म्हणाली की अमिताभ तिच्यावर झुंबर पाडून तिला मारण्याचा प्रयत्न करत आहेत आणि दिग्दर्शक रमेश सिप्पी देखील यात सामील आहेत.
अभिनेत्रीच्या या आरोपांमुळे बॉलिवूडमध्ये वादळ निर्माण झाले होते.
अभिनेत्रीच्या या आरोपांमुळे बॉलिवूडमध्ये वादळ निर्माण झाले होते. एवढेच नाही तर परवीनने या प्रकरणात अमिताभ यांच्याविरुद्ध पोलिस तक्रार दाखल केली होती आणि त्यांना न्यायालयात खेचले. परंतु अमिताभ यांना कोर्टाकडून क्लीन चिट मिळाली. कोर्टाने म्हटले की परवीन स्किझोफ्रेनिया नावाच्या मानसिक आजाराने ग्रस्त आहे, म्हणूनच ती असे आरोप करत आहे.पण त्यावेळी हे प्रकरण प्रचंड चर्चेत आलं होतं.
