AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Narendra Modi : भारतीय सिनेमाने भारताला जगाच्या कानाकोपऱ्यात नेलं – नरेंद्र मोदी

"आपण भारतीय सिनेमाच्या अनेक दिग्गजांना टपाल तिकिटाच्या माध्यमातून स्मरणात ठेवलं आहे. गेल्या काळात मी गेमिंग वर्ल्ड, फिल्ममेकर, अभिनेते, संगीतकारांना भेटलो. त्यांच्याशी चर्चा केली. त्यात भारताची क्रिएटिव्हिटी आणि ग्लोबल कोलॅब्रेशनची चर्चा व्हायची. मी तुमच्याकडून आयडिया घ्यायचो. मलाही या विषयात खोलवर जाण्याची संधी मिळायची" असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

PM Narendra Modi : भारतीय सिनेमाने भारताला जगाच्या कानाकोपऱ्यात नेलं - नरेंद्र मोदी
PM Modi
| Updated on: May 01, 2025 | 1:05 PM
Share

“या भूमीतील सर्व बंधू भगिनींना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज गुजरातचाही स्थापना दिवस आहे. जगभरात असलेल्या गुजराती भावा बहिणींनाही गुजरात स्थापना दिवसाच्या शुभेच्छा. मुंबईत 100 हून अधिक देशाचे आर्टिस्ट, इनोव्हेटर, इनव्हेस्टर आणि पॉलिसी मेकर एकत्र आले आहेत. एक प्रकारे या ठिकाणी ग्लोबल टॅलेंट आणि ग्लोबल क्रिएटिव्हीटीच्या ग्लोबल इको सिस्टिमची पायाभरणी होत आहे” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी WAVES Edition ग्लोबल समिटच्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले. न्यूज 9 ने या समिटच आयोजन केलं आहे. जिओ कनव्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित या शिखर परिषदेत ते बोलत होते. बॉलिवूडमधील अनेक स्टार्स या क्रार्यक्रमाला उपस्थित आहेत. रणबीर सिंह, आलिया भट्ट, शाहरुख खान, अक्षय कुमार असे स्टार्स या कार्यक्रमाला हजर आहेत.

“वेव्हज हे केवळं अक्रोनेम नाहीये. हे खरोखरच एक वेव आहे. कल्चरची, क्रिएटिव्हिटीची आणि यूनिव्हर्सल कनेक्टची. यात सिनेमा, संगीत, गेमिंग, अॅनिमेशन, स्टोरीटेलिंग, क्रिएटिव्हीटीचं जगच आहे. वेव्ह ग्लोबल प्लॅटफॉर्म आहे. तुमच्यासारख्या प्रत्येक आर्टिस्ट आणि क्रिएटरचा आहे. नव्या आयडिया घेऊन क्रिएटिव्हवर्ल्डशी आर्टिस्ट जोडला जाईल. या ऐतिहासिक सुरुवातीसाठी मी तुम्हा सर्वांचं अभिनंदन करतो” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

भारतीय सिनेमाने भारताला जगाच्या कानाकोपऱ्यात नेलं

“आज १ मे आहे. आजपासून ११२ वर्षापूर्वी २ मे १९१३ रोजी भारतात पहिली फिचर फिल्म राजा हरिश्चंद्र रिलीज झाली होती. त्याचे निर्माते दादासाहेब फाळके होते. कालच त्यांची जयंती झाली. गेल्या एका शतकात भारतीय सिनेमाने भारताला जगाच्या कानाकोपऱ्यात नेण्यात यश मिळवलं आहे. रशियात राज कपूर यांची लोकप्रियता, कानमध्ये सत्यजित रे यांची लोकप्रियेता. आणि ऑस्करमध्ये RRR यश दिसतं. गुरुदत्त यांची सिनेमॅटिक पोएट्री असो किंवा ऋत्विक घटक यांचं सोशल रिफ्लेक्शन असो. ए आर रहमान यांचं संगीत असो की राजामौलींची महागाथा असो प्रत्येक कहाणी भारतीय संस्कृतीचा आवाज बनून जगाच्या मनात बसली आहे” अशा शब्दात पीएम मोदींनी भारतीय सिनेमाच कौतुक केलं.

ही समिट आपल्या पहिल्या पर्वापासूनच चमकतेय

“मी एक प्रयोग केला. सहा-सात वर्षापूर्वी मी गांधी जयंतीनिमित्ताने १५० देशातील गायक गायिकांना गांधींचं गीत गायला प्रेरित केलं. गांधींच्या १५०व्या जयंतीनिमित्ताने जगभरातील गायकांनी ते गायलं. याचा परिणाम म्हणजे जग एकत्र आलं. या ठिकाणी अनेक लोक आहेत. त्यांनीही त्यावेळी आपले दोन दोन तीन तीन मिनिटाचे व्हिडीओ केले होते. भारत आणि जगातील क्रिएटीव्ह लोक काय करू शकतो हे दाखवून दिलं. आज त्याच काळातील कल्पना वास्तवात आली आहे. जसा नवीन सूर्य उगवल्यावर आकाशाला रंग देतो. तसंच ही समिट आपल्या पहिल्या पर्वापासूनच चमकत आहे” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.