वस्तू तुटण्याचे आवाज,रात्रभर पायऱ्यांवर बसून राहयचो; रणबीरवर झालाय कौटुंबिक वादाचा वाईट परिणाम
नीतू कपूर आणि ऋषी कपूर यांचे नाते कसे होते आणि त्याचा रणबीरच्या आयुष्यावर कसा परिणाम झाला हे त्याने एका मुलाखतीत सांगितलं आहे. एवढंच नाही तर त्यांची सतत भांडणं व्हायची याचा त्यांच्या आयुष्यावर कसा परिणाम व्हायचा हे देखील रणबीरने सांगितलं,

रणबीर कपूर हा बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्यांपैकी एक आहे. तो कपूर कुटुंबाचा लाडका आहे. त्याच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती एक उत्तम अभिनेता- अभिनेत्री आहेत. रणबीर कपूरचे पालक ऋषी कपूर आणि नीतू कपूर हे बॉलिवूडमधील आवडत्या जोडप्यांपैकी एक. दोघांनीही अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले.रणबीर कपूर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील बऱ्याचदा चर्चेत असतो.एका मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या आई-वडिलांच्या नात्याबद्दलचा खुलासा केला होता. नीतू कपूर आणि ऋषी कपूर यांचे नाते कसे होते आणि त्याचा रणबीरच्या आयुष्यावर कसा परिणाम झाला हे देखील त्याने सांगितलं.
ते रात्रभर भांडत असत…
खरंतर नीतू कपूर आणि ऋषी कपूर यांना चित्रपटाच्या सेटवर प्रेम झाले, त्यानंतर दोघांनीही लग्न केले. मात्र लग्नानंतर ऋषी कपूर आणि नीतू कपूरच्या आयुष्यात समस्या येऊ लागल्या. दोघेही खूप भांडायचे. रणबीर कपूरने स्वतः याबद्दल खुलासा केला होता. रणबीर कपूरने स्वतः त्याचे आईवडील ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांच्यातील भांडण पाहिले आहे. ते रात्रभर भांडत असत आणि वस्तू तुटण्याचे आवाज येत असत. रणबीरही त्याच्या आईवडीलांमधील भांडणामुळे खूप अस्वस्थ व्हायचा. त्याचे लहानपण नेहमीच अशी भांडणं पाहण्यात गेल्याचं त्याने एका मुलाखतीत सांगितलं.
मी तेव्हा 4-4 तास पायऱ्यांवर बसून….
रणबीर कपूर म्हणाला होता- ‘मी माझ्या पालकांसोबत राहत होतो. मी त्यांना एका वेगळ्याच टप्प्यातून जाताना पाहत होतो. मीही त्या टप्प्याचा एक भाग होतो. मी त्यांच्यासोबत एका बंगल्यात राहत होतो. ते तळमजल्यावर राहत होते आणि मी वरच्या मजल्यावर राहत होतो. मला आठवते की रात्री 1 ते पहाटे 5 वाजेपर्यंत त्यांचे भांडण चाललेलं. अशी भांडणं रात्रभर नेहमीच व्हायची. मी तेव्हा 4-4 तास पायऱ्यांवर बसून त्यांचे भांडण ऐकत असायचो. मला अनेक वस्तू तुटल्याचा आवाजही ऐकू यायचा. मी खूप अस्वस्थ व्हायचो’
शाळेत जायची देखील लाज वाटायची
रणबीर पुढे म्हणाला की त्याच्या पालकांच्या भांडणाच्या बातम्या बातम्यांमध्ये प्रसिद्ध होत असत. त्यामुळे त्याला शाळेत जायची देखील लाज वाटायची. मात्र काही काळाने त्याच्या पालकांमध्ये सर्व काही ठीक झाले आणि ते एकमेकांचे चांगले मित्र बनले.
