AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नानंतर नवऱ्याने सासरी राहायचं, भन्नाट रोमँटिक कॉमेडी सिनेमा; ओटीटीवर नंबर 1 वर होतोय ट्रेंड

OTT Movie: नवरा सासरी राहायला गेल्यानंतर काय काय गमतीजमती घडतात, हे पाहण्यासाठी या चित्रपटाची कल्पना नक्कीच उत्सुकता वाढवणारी आहे. वीकेंडला काहीतरी हलकं फुलकं पहायचं असेल तर हा चित्रपट एक चांगला पर्याय आहे.

| Updated on: Aug 26, 2026 | 1:55 PM
Share
ओटीटीवर सध्या रोमँटिक कॉमेडीची आवड असणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक हटके पर्याय चर्चेत आहे. हा चित्रपट 21 ऑगस्टला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला असून आधुनिक नातेसंबंध आणि लग्नानंतरच्या अपेक्षांवर त्यात विनोदी पद्धतीने भाष्य करण्यात आलंय.

1 / 5
या चित्रपटाची कथा पारंपरिक लग्नाच्या संकल्पनेला थोडं उलटं करून मांडते. पावी ही लोकप्रिय इन्फ्लुएन्सर आहे. लग्न झाल्यानंतर ती तिच्या माहेरचं घर सोडण्यास तयार नसते. त्यामुळे नेहमीप्रमाणे नवरी सासरी जाण्याऐवजी नवराच पत्नीच्या घरी राहायला येतो. यानंतर सुरू होतो कुटुंबातील मजेशीर गोंधळ, सांस्कृतिक मतभेद आणि नवरा-बायकोमधील नात्याची खरी परीक्षा.

2 / 5
चित्रपटाचा हाच वेगळा विषय त्याला इतर रोमँटिक कॉमेडीपेक्षा वेगळं बनवतो. लग्नानंतर मुलीनेच घर सोडावं, ही पारंपरिक अपेक्षा का असावी, असा प्रश्नही कथा आपल्या पद्धतीने उपस्थित करते. या चित्रपटात रोमँटिक प्रसंगांसोबतच कौटुंबिक विनोद आणि भावनिक क्षणांचाही समावेश आहे.

3 / 5
नेटफ्लिक्सनेही या चित्रपटाला 'फिल गुड रोमँटिक कॉमेडी' म्हणून सादर केलं आहे. या चित्रपटात राधिका सरतकुमार, योगी बाबू, एम. एस भास्कर यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. सोशल मीडियावर याच्या कथानकाचं आणि कलाकारांच्या अभिनयाचं कौतुक होत आहे.

4 / 5
या चित्रपटाचं नाव आहे 'प्यार प्रेमा कल्याणम'. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या एलान यांच्या 'प्यार प्रमा काढल' या चित्रपटाचा हा स्पिरीच्युअल रीमेक मानला जात आहे. तुम्हा रोमँटिक कॉमेडी, कौटुंबिक गोंधळ आणि पारंपरिक लग्नाच्या कल्पनांना वेगळ्या पद्धतीने मांडणाऱ्या कथा आवडत असतील तर हा चित्रपट एक चांगला पर्याय ठरू शकतो.

5 / 5
Follow Us
MPSC FDA पेपरफुटी: अभिमन्यू पवारांची उच्चस्तरीय चौकशीची मागणी
औषध निरीक्षक परीक्षा रद्द: पेपरफुटीमागे कोण?
एका प्रियकरामुळे हजारो विद्यार्थ्यांना फटका
MPSC FDA पेपरफुटी प्रकरणात लव्ह स्टोरीचा धक्कादायक अँगल
मुंबईतील वडापाव विक्रेत्यांनी घेतली तुकाराम मुंढेंची धास्ती,
मुंबईतील वडापाव विक्रेत्यांनी घेतली तुकाराम मुंढेंची धास्ती, असं काही केलं की...
विशेष बातमी! मध्य रेल्वेवर शुक्रवारपासून सलग 15 दिवसांचा ब्लॉक, कारण..
मुंबईकरांसाठी विशेष बातमी! मध्य रेल्वेवर शुक्रवारपासून सलग 15 दिवसांचा ब्लॉक, सर्वात मोठा बदल घडणार?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सर्वात मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द, नेमकं काय घडलं?
एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थक...
एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थकांची जोरदार बॅनरबाजी; चक्क...
याला म्हणतात luxurious! रुपाली चाकणकर यांचं हॉटेल व्यवसायात पदार्पण

पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले...बड्या नेत्याचा दावा
मोठी बातमी ! पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले...या नेत्याच्या दाव्याने पुन्हा खळबळ
सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटन...
सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटनात बड्या नेत्याची हजेरी
मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री...
मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री काँग्रेस नेत्याच्या...