AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saif Ali Khan Attack : अंगावर झाडाची पानं, पांघरलेलं गवत अन्… ठाण्यातील ‘या’ परिसरात लपलेला आरोपी, कशी केली अटक? पाहा A टू Z अपडेट

मोहम्मद अलियान उर्फ ​​विजय दास असे या आरोपीचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. विजय दास याला ठाण्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. तो पश्चिम बंगालच्या नदिया जिल्ह्यातील रहिवाशी आहे.

Saif Ali Khan Attack : अंगावर झाडाची पानं, पांघरलेलं गवत अन्... ठाण्यातील 'या' परिसरात लपलेला आरोपी, कशी केली अटक? पाहा A टू Z अपडेट
saif ali khan accuse arrest from thane
Follow us
| Updated on: Jan 19, 2025 | 10:30 AM

Saif Ali Khan Attack : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ल्याप्रकरणी मुख्य आरोपीला अखेर अटक करण्यात आली आहे. मोहम्मद अलियान उर्फ ​​विजय दास असे या आरोपीचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. विजय दास याला ठाण्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. तो पश्चिम बंगालच्या नदिया जिल्ह्यातील रहिवाशी आहे. सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला कशी अटक करण्यात आली, पोलिसांनी कसा सापळा रचला याची माहिती समोर आली आहे.

मुंबई पोलिसांनी सैफ अली खानवर चाकू हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीला ठाण्यातून अटक केली आहे. ठाण्यातील कासारवडवली भागातून मध्यरात्री ३ च्या सुमारास ही अटक करण्यात आली आहे. आरोपी विजय दासला ठाण्याच्या लेबर कॅम्पजवळील जंगलातून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट येथील टीसीएस कॉल सेंटरच्या मागे मेट्रो कन्स्ट्रक्शन साईटजवळ हे लेबर कॅम्प आहे. तब्बल २०० जण असलेल्या पोलिसांच्या पथकाने सापळा रचत मुख्य आरोपीला अटक केली आहे.

लेबर कॅम्पजवळील जंगलात कोंबिंग ऑपरेशन 

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून हा आरोपी शर्ट बदलत पोलिसांना चकवा देत होता. पोलिसांकडून सातत्याने त्याचे लोकेशन ट्रेस केले जात होते. अखेर काल रात्री ठाण्यातील लेबर कॅम्प भागात त्याचे लोकेशन असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी लेबर कॅम्पजवळील जंगलाच्या परिसरात कोंबिंग ऑपरेशन केले. यावेळी आरोपीने लपण्यासाठी अंगावर झाडाची पानं आणि गवत पांघरलं होतं. अखेर वांद्रे पोलीस, मुंबई गुन्हे शाखा आणि ठाणे पोलीस यांच्या संयुक्त कारवाईतून त्याला अटक करण्यात आली आहे.ॉ

आरोपीकडून गुन्ह्याची कबुली

मोहम्मद अलियान उर्फ ​​विजय दास याला अटक केल्यानंतर त्याने सैफ अली खानवर चाकू हल्ला केल्याची कबुली दिली आहे. यानतंर त्याला मध्यरात्री चेंबूर पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. यावेळी मुंबई पोलीस आणि क्राईम ब्रांचच्या टीमकडून आरोपीची चौकशी करण्यात आली. चेंबूरनंतर आरोपीला पहाटे ४ वाजता खार पोलिसांत आणण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून ही शोध मोहिम सुरु होती. अखेर दोन दिवसांच्या शोध मोहिमेनंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

चौकशी सुरु

सध्या पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी सुरु आहे. सैफ अली खानच्या घरात आरोपी कसा घुसला? आरोपींचा हेतू काय होता? या कामात त्याला साथ देणारा दुसरा कोणी आहे का? त्याने आणखी किती बॉलिवूड कलाकारांच्या घराची रेकी केली आहे? सैफच्या घरी जाण्याचा त्याचा उद्देश काय होता? त्याला कोणाला टार्गेट करायचा होते? ज्यांच्या मदतीने आरोपी सैफच्या घरी पोहोचला तो कोण आहे? असे अनेक मोठे प्रश्न उपस्थित होत आहे. आज पोलीस चौकशीदरम्यान याप्रकरणाची उत्तर शोधणार आहेत.

मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'
मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'.
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?.
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?.
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?.
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती.
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर.
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्...
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्....
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून...
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून....
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने.
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी.