Saiyaara : बॉक्स ऑफीसवर ‘सैयारा’चा धूमाकूळ, टायटल साँग कोणी गायलंय माहित्ये का ?
Saiyaara : नुकताच रिलीज झालेला 'सैयारा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाच्या कथेसोबतच गाण्यांनाही लोकांना चांगलंच वेड लावलं असून ती खूप पसंत केली जात आहेत. चित्रपटाचं शीर्षकगीत सर्वाधिक व्हायरल होत आहे. त्याचा गायक कोण, काय करतो तो ? जाणून घेऊया सर्वकाही..

ल्या आठवड्यात रिलीज झालेला ‘सैयारा’ हा चित्रपट सध्या सगीकडे धूमाकूळ घालतोय. जिथे पहावं तिथे या चित्रपटाचीच चर्चा सुरू आहे. हा चित्रपटान बॉक्स ऑफीसवर देखील जबरदस्त कमाई करताना दिसत आहे. या चित्रपटातून पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर पदार्पण करणाऱ्या अहान पांडे आणि अनित पड्डा यांचं नशीबही चांगलंच चमकलं आहे. त्यांच्या पहिल्याच चित्रपटाने दोघेही रातोरात स्टार झाले आहेत. अहान आणि अनित व्यतिरिक्त, आणखी एक व्यक्ती आहे ज्याने लोकांना त्याच्याबद्दल वेड लावले आहे. तो इसम दुसरा तिसरा कोणी न्वहे तर सैयारा चित्रपटाचा टायटल ट्रॅक गाणारा मुख्य गायक फहीम अब्दुल्ला हा आहे. या गाण्याने फहीमचं नशीबचं पलटलं आहे.
कोण आहे फहीम अब्दुल्ला ?
सध्या जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी.. सगळीकडे फक्त सैयारा चित्रटाच चर्चा आणि त्याचीच गाणी कानावर पडत आहेत. त्यातही एक गाणं तर सगळीकडेच ऐकायला येतंय ते म्हणजे सैयारा फिल्मचा टायटल ट्रॅक. हे शीर्षकगीत फहीमने गायले आहे. त्याने त्याचा जुना मित्र अर्सलान निजामी सोबत हे गाणे संगीतबद्ध केले आहे. फहीम हा काश्मीरचा रहिवासी आहे आणि संगीत क्षेत्रात करिअर करण्यासाठी मुंबईत आला होता. खरं सांगायचं तर फहीम काश्मीरमध्ये खूप प्रसिद्ध होता पण मुंबईत त्याला फारशी ओळख मिळाली नाही.
13 दिवसांत चमकलं नशीब
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अर्सलान निजामीने त्याच्या प्रवासाबद्दल सांगितले. त्याने सांगितले की तो नोकरी सोडून फहीमसोबत मुंबईत आला होता. दोघांकडे 14 दिवसांच्या खर्चासाठी पैसे होते. 13 व्या दिवशी ते तनिष्क बागचीला भेटले. तेव्हा तनिष्क हा ‘सैय्यारा’ चित्रपटासाठी एक गाणं तयार करत होता. या भेटीने त्याचे आयुष्य बदलून गेले. फहीमने सैय्यारा चे शीर्षक गीत गायले आणि तो स्टार बनला. सध्या त्याचं गाणं पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.
विशेष म्हणजे, गायक असण्यासोबतच फहीम एक गीतकार, कवी, चित्रपट निर्माता, वक्ता, कार्यक्रम व्यवस्थापक देखील आहे. सय्यारा या शीर्षकगीतापूर्वी फहीमने ‘इश्क’, ‘झेलम’, ‘गल्लान’, ‘ए याद’, ‘जुदाई’, ‘तेरा होना’, ‘आँखें’ अशी अनेक गाणी गायली आहेत.
सैय्याराची जबरदस्त कमाई
दिग्दर्शक मोहित सुरी यांच्या ‘सैयारा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. अहान पांडे आणि अनित पद्डा अभिनीत या रोमँटिक ड्रामा चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाची माउथ पब्लिसिटीदेखील अद्भुत आहे. त्याला जेन झीचा डीडीएलजे म्हटले जात आहे. त्याचबरोबर बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाचे वादळ थांबण्याचे नाव घेत नाहीये. सोमवारच्या कलेक्शननंतर अवघ्या चार दिवसांतच या चित्रपटाने 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला असला तरी, मंगळवारी त्याने सोमवारपेक्षा जास्त कमाई केली आहे. एकूण कलेक्शनबद्दल जाणून घेऊया.
रिपोर्ट्सनुसार, ‘सैयारा’ने 2025 मध्ये आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये स्थान मिळवले आहे. मोहित सुरी यांच्या ‘सैयारा’ चित्रपटाला चांगली सुरुवात झाली. पहिल्या दिवशी या चित्रपटाने 21 कोटींचा व्यवसाय केला. दुसऱ्या दिवशी, त्याने पहिल्या दिवसापेक्षा जास्त कमाई केली, 26 कोटींची कमाई केली. त्यानंतर, तिसऱ्या दिवशी, म्हणजे रविवारी, त्याने आणखी चांगली कामगिरी केली. चित्रपटाने 35.75 कोटींचा व्यवसाय करून खळबळ उडवून दिली.
एवढंच नव्हे तर वीकडेजमध्ये जेव्हा इतर चित्रपटांची कमाई मंदावू लागते, असे असतानाही, ‘सैयारा’ने मंगळवारी सोमवारपेक्षा जास्त कमाई केली. पहिल्या सोमवारच्या चाचणीत, चित्रपटाने 24 कोटींचा व्यवसाय केला, त्यानंतर तो 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करण्यात यशस्वी झाला. चित्रपटाने चार दिवसांत मोठे यश मिळवले. त्यानंतर, मंगळवारी पाचव्या दिवशी या चित्रपटाने 25 कोटींची कमाई केली, जी सोमवारपेक्षा जास्त आहे. पाच दिवसांत चित्रपटाचे एकूण कलेक्शन 132.25 कोटींवर पोहोचले आहे.
