AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Khan: शाहरुखला मिठी मारताच भावूक झाला सलमान; ‘भाईजान’च्या वाढदिवशी ‘किंग’ खानकडून खास भेट

बर्थडे पार्टीत सलमान-शाहरुखची मैत्री पाहून चाहते म्हणाले, 'करण-अर्जुन आ गए...'

| Updated on: Dec 27, 2022 | 12:14 PM
Share
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान त्याचा 57 वा वाढदिवस साजरा करतोय. सलमानचा वाढदिवस त्याच्या सर्व चाहत्यांसाठी आणि इंडस्ट्रीतील कलाकारांसाठी खास असतो. यानिमित्त जंगी पार्टी तर होणारच! सलमानच्या या पार्टीला शाहरुख खाननेही हजेरी लावली.

1 / 9
सलमानच्या वाढदिवसानिमित्त पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. रात्री उशिरा झालेल्या या पार्टीत बऱ्याच सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. मात्र शाहरुखच्या हजेरीने सर्वांचंच लक्ष वेधलं.

सलमानच्या वाढदिवसानिमित्त पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. रात्री उशिरा झालेल्या या पार्टीत बऱ्याच सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. मात्र शाहरुखच्या हजेरीने सर्वांचंच लक्ष वेधलं.

2 / 9
पार्टीतील सलमान आणि शाहरुख या दोघांचा आऊटफिट अगदी सारखाच होता. काळ्या रंगाचा शर्ट आणि त्यावर डार्क कलरची जीन्स, असा दोघांचा लूक होता.

पार्टीतील सलमान आणि शाहरुख या दोघांचा आऊटफिट अगदी सारखाच होता. काळ्या रंगाचा शर्ट आणि त्यावर डार्क कलरची जीन्स, असा दोघांचा लूक होता.

3 / 9
सलमान आणि शाहरुख यांच्यातील वाद सर्वांनाच माहीत असेल. 2008 मध्ये कतरिना कैफच्या बर्थडे पार्टीत शाहरुखने सलमानची एक्स गर्लफ्रेंड ऐश्वर्या रायबद्दल काहीतरी म्हटलं होतं. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला.

सलमान आणि शाहरुख यांच्यातील वाद सर्वांनाच माहीत असेल. 2008 मध्ये कतरिना कैफच्या बर्थडे पार्टीत शाहरुखने सलमानची एक्स गर्लफ्रेंड ऐश्वर्या रायबद्दल काहीतरी म्हटलं होतं. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला.

4 / 9
या वादावर 'आप की अदालत'मध्ये शाहरुखने प्रतिक्रिया दिली होती. मात्र हे भांडण मिटवत नंतर दोघं एकत्र आले. शाहरुखचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक झाली, तेव्हा सलमानने 'मन्नत' बंगल्यावर जाऊन शाहरुखची भेट घेतली होती.

5 / 9
या पार्टीत शाहरुखने त्याच्या चाहत्यांना आणि पापाराझींना फ्लाइंग किस देत त्यांना अभिवादन केलं. शाहरुखच्या भेटीनंतर सलमानच्याही चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत होता.

या पार्टीत शाहरुखने त्याच्या चाहत्यांना आणि पापाराझींना फ्लाइंग किस देत त्यांना अभिवादन केलं. शाहरुखच्या भेटीनंतर सलमानच्याही चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत होता.

6 / 9
सलमान आणि शाहरुखच्या या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. 'बॉलिवूडचे करण-अर्जुन' असे कमेंट्स चाहते या फोटोंवर करत आहेत.

सलमान आणि शाहरुखच्या या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. 'बॉलिवूडचे करण-अर्जुन' असे कमेंट्स चाहते या फोटोंवर करत आहेत.

7 / 9
सलमान सध्या 'बिग बॉस 16'चं सूत्रसंचालन करतोय. तर शाहरुख त्याच्या आगामी 'पठाण' या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.

सलमान सध्या 'बिग बॉस 16'चं सूत्रसंचालन करतोय. तर शाहरुख त्याच्या आगामी 'पठाण' या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.

8 / 9
सलमानच्या या बर्थडे पार्टीत शाहरुखसोबतच बॉलिवूड इंडस्ट्रीतील बरेच सेलिब्रिटी उपस्थित होते. युलिया वंतूर, तब्बू, सोनाक्षी सिन्हा, संगीता बिजलानी, रितेश देशमुख, जिनिलिया देशमुख, कार्तिक आर्यन यांसारखे सेलिब्रिटी सलमानच्या पार्टीत दिसले.

9 / 9
Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच