मला फार्महाऊसवर बोलावलं, जाऊ दिलं नाही…; दबंगमधील खलनायकाच्या मुलीने केली सलमानची पोल खोल
दबंग ३ हा चित्रपट २०१९मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील खलनायकाच्या मुलीने भाईजान बाबात मोठा खुलासा केला आहे. आता ती काय म्हणाली चला जाणून घ्या...

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा ‘दबंग’ हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. 2019मध्ये ‘दबंग 3’ हा चित्रपट आला होता. या चित्रपटात साऊथचा सुपरस्टार अभिनेता किच्चा सुदीपदेखील दिसला होता. त्याने खलनायकाची भूमिका साकारली होती. अलीकडेच साऊथ अभिनेत्याची मुलगी सान्वी सुदीपने सलमानसोबतच्या तिच्या नात्यावर वक्तव्य केले. ‘दबंग 3’ च्या शूटिंगची आठवण सांगताना तिने सलमान खानसोबतच्या बॉन्डिंगवर देखील वक्तव्य केले. तिने सांगितले की भाईजानबद्दल अनेकांचा गैरसमज आहे.
जिनल मोदींच्या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सानवी सुदीप म्हणाली, ‘माझ्या आयुष्यातील तो सर्वात अविस्मरणीय काळ होता, जेव्हा वडील दबंग 3 चे शूटिंग करत होते. मी लहानपणी सलमान खानसाठी एक ब्रेसलेट बनवले होते. जे त्याने बिग बॉस दरम्यान घातले होते. त्यामुळे दबंग 3च्या निमित्ताने जेव्हा तो पुन्हा भेटला तेव्हा त्याला त्याची आठवण होती.’ किच्चा सुदीप लेकीला घेऊन सलमान खानच्या देखील घरी गेला होता.




View this post on Instagram
ती पुढे म्हणते, ‘त्या दिवशी तो माझ्यावर खूप प्रभावित झाला. त्याने मला गाण्यास सांगितले. म्हणून मी त्याच्यासाठी गाणे गायले आणि रात्री 3 वाजता त्याने संगीत दिग्दर्शकाला फोन केला आणि सांगितले हीचा आवाज ऐकून मला रेकॉर्ड करुन पाठवा. भविष्यात कधीही आपल्याला गरज भासू शकते. मी दुसऱ्या दिवशी तिथे गेले. त्यानंतर त्यांनी मला पुन्हा त्यांच्या फार्महाऊसवर बोलावले. माझे आई-वडील आजूबाजूला आहेत की नाही याची त्याला पर्वा नव्हती. सकाळपासून रात्रीपर्यंत मी त्याच्यासोबत राहिले. त्यांनी मला जाऊ दिले नाही. तिथेच थांबवले होते.’
किच्चा सुदीपची मुलगी पुढे म्हणते की, बहुतेक लोक सलमान खानबाबत गैरसमज करतात. अभिनेत्यासोबतचा तिचा अनुभव शेअर करताना ती म्हणते की, भाईजानच्या फार्महाऊसमध्ये घालवलेले 3 दिवस तिच्या आयुष्यातील सर्वोत्तम आणि कधीही न विसरणारे दिवस होते.