Salman Khan | ‘या तारखेला मारेन’; सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी

सलमानला यापूर्वीही जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. म्हणूनच खबरदारीसाठी त्याने नुकतंच स्वतःसाठी एक संरक्षण कवच अर्थात बुलेट प्रूफ कारची खरेदी केली आहे. सलमानने निसान पेट्रोल एसयूव्ही कार स्वतःच्या ताफ्यात समाविष्ट केली आहे.

Salman Khan | 'या तारखेला मारेन'; सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी
Salman KhanImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Apr 11, 2023 | 10:41 AM

मुंबई : अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. सोमवारी रात्री एका व्यक्तीने मुंबई पोलीस कंट्रोलला फोन केला आणि सलमानला मारण्याची धमकी दिली. धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्वत:चं नाव रॉकी भाई असं सांगितलं. या धमकीच्या फोननंतर मुंबई पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे. फोन करणाऱ्या रॉकी भाईने पोलीस कंट्रोलला सांगितलं की तो जोधपूरचा राहणारा आहे आणि तो एक गोरक्षक आहे. सोमवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास हा फोन आला होता.

याआधी बिश्नोई गँगचा कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईने सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. जेव्हा मी सलमान खानला मारेन तेव्हाच खरा गुंड म्हणवून घेईन, अशी धमकीच बिश्नोईने दिली होती. तुरुंगात हातापायात बेड्या घालून शिक्षा भोगत असलेल्या बिश्नोईने थेट धमकी दिल्याने पोलिसांचीही झोप उडाली होती.

‘आम्ही आमच्या हिशोबाने कारवाई करू’

लॉरेन्स बिश्नोईने तुरुंगातून एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीदरम्यान त्याने सलमान खानला ठोस उत्तर देण्याबाबत वक्तव्य केलं होतं. “आमच्या समाजाने जर त्याला माफ केलं नाही तर आम्ही आमच्या हिशोबाने कारवाई करू. आम्ही कोर्ट किंवा इतर कोणत्या गोष्टीवर अवलंबून राहणार नाही”, असा इशारा त्याने दिला होता.

हे सुद्धा वाचा

सलमानने त्यांच्या मंदिरात जाऊन त्यांची माफी मागावी, अशीही मागणी बिश्नोईने केली होती. “बिकानेरच्या पुढे नौखा तहसीलमध्ये आमचं मंदिर आहे. तिथे येऊन त्याने माफी मागावी. जर त्याने माफी मागितली नाही तर आम्ही त्याचा अहंकार मोडल्याशिवाय राहणार नाही. ही धमकी नाही तर विनंती आहे. सलमानला माझ्या गँगकडून कोणताच धोका नाही. माझी इतकीच मागणी आहे की त्याने आमच्या समाजाला संतुष्ट करावं”, असं त्याने स्पष्ट केलं होतं.

सलमानने खरेदी केली बुलेट प्रूफ कार

सलमानला यापूर्वीही जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. म्हणूनच खबरदारीसाठी त्याने नुकतंच स्वतःसाठी एक संरक्षण कवच अर्थात बुलेट प्रूफ कारची खरेदी केली आहे. जेणेकरून घराबाहेर पडल्यानंतर काही घटना घडलीच तर या कारद्वारे सलमान स्वतःचा बचाव करू शकेल. सलमानने निसान पेट्रोल एसयूव्ही कार स्वतःच्या ताफ्यात समाविष्ट केली आहे. सध्या ही कार भारतीय बाजारपेठेत लाँचदेखील झाली नाहीये. पण वारंवार येणाऱ्या धमक्यांनंतर सलमानने ही कार खरेदी केली आहे.

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.