Photo : सलमानची लाडकी मुन्नी झाली टीएनएजर, वाढदिवसाचे फोटो, व्हिडीओ शेअर

हर्षालीनं केक कापतानाचे काही फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Salman's darling Munni becomes a teenager, Harshali Malhotra shared her birthday photos)

1/6
Harshali Malhotra
2015 मध्ये सलमान खानचा सुपरहिट चित्रपट बजरंगी भाईजामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत सर्वांची मनं जिंकणारी मुन्नी म्हणजेच हर्षाली मल्होत्रा आता मोठी झाली आहे. तिचा 3 जून रोजी वाढदिवस होता. आता हर्षाली ऑफिशियली टीनएजर झाली आहे. हर्षालीनं तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
2/6
Harshali Malhotra
हर्षालीनं केक कापतानाचे काही फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. कारण हर्षालीनं आयुष्याची 13 वर्षे पूर्ण केली आहेत. यानिमित्तानं हर्षालीसाठी खास केक मागविण्यात आला. केकवर ऑफिशियल टीनएजर असं लिहिलेलं आहे.
3/6
Harshali Malhotra
वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये हर्षालीनं पिंक कलरचा ड्रेस घातला होता, यात ती खूपच क्यूट दिसत होती.
4/6
Harshali Malhotra
सोशल मीडियावर चाहत्यांनीही हर्षालीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
5/6
Harshali Malhotra
वाढदिवशी हर्षालीनं अनेक केक कापलेत. तिच्या एका केकवर मुन्नी लिहिलं होतं.
6/6
हर्षलीला रातोरात स्टार बनवणारी ही भूमिका आहे. या भूमिकेतून हर्षाली सर्वांच्या पसंतीस उतरली. आजही बजरंगी भाईजानच्या मुन्नीला विसरणं कठीण आहे.