AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉलिवूडमध्ये कंबर लचकावण्यापेक्षा… 36 वर्षीय लेकीबद्दल असं काय म्हणाला संजय दत्त?

Sanjay Dutt Daughter | संजय दत्त यांची मोठी लेक का असते झगमगत्या विश्वापासून दूर? तिने बॉलिवूमध्ये का नाही केलं पदार्पण? संजूबाबाच्या वक्तव्यानंतर व्हाल हैराण..., संजूबाबा याची मोठी लेक त्रिशाला दत्त सोशल मीडियावर कायम असते सक्रिय, पण झगमगत्या विश्वापासून असते दूर... लेकीच्या आयुष्याबद्दल अभिनेत्याचं मोठं वक्तव्य...

बॉलिवूडमध्ये कंबर लचकावण्यापेक्षा... 36 वर्षीय लेकीबद्दल असं काय म्हणाला संजय दत्त?
Updated on: Apr 20, 2024 | 9:26 AM
Share

अभिनेता संजय दत्त बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता आहे. आतापर्यंत संजय याने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. आजही अभिनेत्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. एवढंच नाहीतर, अभिनेत्याच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी देखील चाहते उत्सुक असतात. संजूबाबा आज त्याच्या तिसऱ्या कुटुंबासोबत आनंदाने आयुष्य जगत आहे. पण अभिनेत्याच्या पहिल्या कुटुंबाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

संजूबाबा याच्या पहिल्या कुटुंबाबबद्द सांगायचं झालं तर, अभिनेत्याच्या पहिल्या पत्नीचं नाव ऋचा शर्मा असं होतं. ऋचा हिचं कर्करोगाने निधन झालं. संजय – ऋचा यांची एक मुलगी आहे. त्यांच्या मुलीचं नाव त्रिशाला असं आहे. त्रिशाला लहानपणापासूनच अमेरिकेत तिच्या आजी – आजोबांसोबत राहते. अशात, वडील सुपरस्टार असताना त्रिशाला हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण का नाही केलं? असा प्रश्न अभिनेत्याला कायम विचारला जातो…

एका जुन्या मुलाखतीत संजय दत्त याने मुलगी त्रिशाला हिच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. ‘त्रिशाला अमेरिकेत मानसोपचारतज्ज्ञ आहे… गोष्ट याठिकाणीच संपते… बॉलिवूडमध्ये येऊन तिने कंबर लचकावण्यापेक्षा ती तिच्या क्षेत्रात योग्य कार्य करत आहे…’ सध्या सर्वत्र संजय दत्त आणि त्रिशाला हिची चर्चा रंगली आहे.

त्रिशाला दत्त हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ती 36 वर्षांची आहे. पण अद्याप त्रिशाला हिने लग्न करण्याचा निर्णय घेतलेला नाही. संजू बाबाची लेक झगमगत्या विश्वापासून दूर असली, तरी त्रिशाला सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अभिनेत्री नसली तरी सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. त्रिशाला हिचे सावत्र आई आणि भावंडांसोबत देखील चांगले संबंध आहेत. त्यांचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

त्रिशाला हिच्या आईबद्दल सांगायचं झालं तर, कर्करोगामुळे ऋचा शर्मा याचं निधन झालं. ऋचा शर्मा पूर्णपणे संजय दत्त याच्या प्रेमात होती. दोघांनी लग्न देखील केलं. लग्नाच्या 1 वर्षानंतर ऋचा हिने त्रिशाला हिला जन्म दिला. पण लग्नाच्या दीड वर्षानंतर ऋषा हिचं निधन झालं. ऋचा हिचं 10 डिसेंबर 1996 रोजी कर्करोगामुळे निधन झालं.

माझ्या पत्नीच्या नावाने सावली बार, पण..; रामदास कदमांचा खुलासा
माझ्या पत्नीच्या नावाने सावली बार, पण..; रामदास कदमांचा खुलासा.
हनीट्रॅपमुळे शिंदेंचं सरकार आलं; वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
हनीट्रॅपमुळे शिंदेंचं सरकार आलं; वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा.
निशिकांत दुबेने पुन्हा राज ठाकरेंना चिमटी काढली, म्हणाले..
निशिकांत दुबेने पुन्हा राज ठाकरेंना चिमटी काढली, म्हणाले...
भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेते पद का नाही? राऊतांचा मोठा दावा
भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेते पद का नाही? राऊतांचा मोठा दावा.
राज ठाकरेंच्या विरोधात थेट सुप्रीम कोर्टात याचिका; काय आहे प्रकरण?
राज ठाकरेंच्या विरोधात थेट सुप्रीम कोर्टात याचिका; काय आहे प्रकरण?.
मातोश्रीवर शकुनी मामा बसलेला आहे; नितेश राणे ठाकरे बंधूंवर बरसले
मातोश्रीवर शकुनी मामा बसलेला आहे; नितेश राणे ठाकरे बंधूंवर बरसले.
खळ्ळखट्याकची भाषा वापरताच मुनगंटीवारांनी काढले राज ठाकरेंचे संस्कार
खळ्ळखट्याकची भाषा वापरताच मुनगंटीवारांनी काढले राज ठाकरेंचे संस्कार.
दाऊदला देखील पक्ष प्रवेश मिळेल; संजय राऊतांची फटकेबाजी
दाऊदला देखील पक्ष प्रवेश मिळेल; संजय राऊतांची फटकेबाजी.
घालीन लोटांगण, वंदीन चरण..; उद्धव ठाकरेंची खरपूस टीका
घालीन लोटांगण, वंदीन चरण..; उद्धव ठाकरेंची खरपूस टीका.
तर दुकानं नाही, शाळाही बंद करेन;'राज' गर्जनेतून मुख्यमंत्र्यांना इशारा
तर दुकानं नाही, शाळाही बंद करेन;'राज' गर्जनेतून मुख्यमंत्र्यांना इशारा.