‘खलनायक’च्या रिमेकमध्ये रणवीर सिंग नको; संजूबाबाचं कारण ऐकून पोट धरून हसाल!

स्वाती वेमूल, Tv9 मराठी

|

Updated on: Oct 21, 2022 | 7:21 PM

'खलनायक'च्या रिमेकमध्ये संजय दत्तने 'या' कारणासाठी रणवीरला केलं रिजेक्ट

'खलनायक'च्या रिमेकमध्ये रणवीर सिंग नको; संजूबाबाचं कारण ऐकून पोट धरून हसाल!
Sanjay Dutt and Ranveer Singh
Image Credit source: Instagram

मुंबई- अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) लवकरच ‘केस तो बनता है’ या कॉमेडी कोर्टरुम शोमध्ये दिसणार आहे. या शोमध्ये रितेश देशमुख आणि कुशा कपिला हे संजूबाबाला विविध प्रश्न विचारणार आहेत. काही महिन्यांपूर्वी अभिनेता रणवीर सिंगचा (Ranveer Singh) न्यूड फोटोशूट व्हायरल झाला होता. त्यावरून सोशल मीडियावर मोठा वादही झाला. त्यावरूनच आता संजय दत्तने आपली मजेशीर प्रतिक्रिया या शोमध्ये दिली.

वरुण शर्माने संजय दत्तला प्रश्न विचारला की 1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘खलनायक’ या चित्रपटाचा रिमेक बनला तर त्यात कोणत्या अभिनेत्याला पहायला तुला आवडणार नाही. यासोबतच त्याने तीन पर्याय दिले. रणवीर सिंग, रणबीर कपूर आणि विकी कौशल असे हे तीन पर्याय होते.

वरुणच्या या प्रश्नाचं उत्तर देताना संजय म्हणाला, “खलनायकच्या रिमेकमध्ये रणवीर सिंगने काम करू नये असं मला वाटतं. कारण मी असं ऐकलंय की तो कपडे परिधान करत नाही.” रणवीरच्या न्यूड फोटोशूटवरून संजूबाबाने ही फिरकी घेतली होती.

हे सुद्धा वाचा

रणवीरने पेपर या मासिकासाठी न्यूड फोटोशूट केलं होतं. मात्र त्यावरून वाद इतका मोठा झाला की रणवीरविरोधात पोलिसांत तक्रारसुद्धा दाखल करण्यात आली होती. तर बॉलिवूड इंडस्ट्रीतील काही लोकांनी रणवीरला पाठिंबा दिला.

संजय दत्त लवकरच ध्रुवा सरजाच्या ‘केडी- द डेव्हिल’ या कन्नड चित्रपटात झळकणार आहे. याआधी संजूबाबाने ‘केजीएफ: चाप्टर 2’ या कन्नड चित्रपटात खलनायकी भूमिका साकारली होती. याच शोमध्ये संजयने विविध दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा बोलून दाखवली.

संजय दत्तच्या खलनायक या चित्रपटात माधुरी दीक्षित, जॅकी श्रॉफ, राखी, रम्या कृष्णन यांच्याही भूमिका होत्या. सुभाष घई यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट आणि त्यातील गाणी तुफान गाजली होती.


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI