AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोण म्हणतं होत नाही? 90 किलोच्या सारा खानने कसं केलं 45 किलो वजन कमी? जाणून घ्या सविस्तर

45 किलो वजन कमी करण्यापूर्वी सारा अली खान रोज खात होती 2 पिझ्झा आणि 3 ब्राउनी; कसं केलं 45 किलो वजन कमी? जाणून घ्या सविस्तर

कोण म्हणतं होत नाही? 90 किलोच्या सारा खानने कसं केलं 45 किलो वजन कमी? जाणून घ्या सविस्तर
| Updated on: May 26, 2026 | 6:50 PM
Share

सारा अली खान सध्या तिच्या ‘पति पत्नी और वो 2’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. मात्र यावेळी तिच्या अभिनयापेक्षा तिच्या जुन्या लाइफस्टाइलबद्दलचा एक खुलासा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका मुलाखतीत साराने तिच्या कॉलेज काळातील खाण्याच्या सवयींबद्दल मोकळेपणाने सांगितले असून ते ऐकून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत.

सारा अली खानने Curly Tales ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, न्यूयॉर्कमध्ये शिक्षण घेत असताना तिच्या खाण्याच्या सवयी पूर्णपणे अनियंत्रित होत्या. ती रोज दोन मीडियम साइज पिझ्झा आणि तीन चॉकलेट चिप ब्राउनी खात होती. साराने हा काळ विचार न करता खाण्याचा असल्याचे सांगितले. त्या वेळी न्यूट्रिशन किंवा हेल्दी डाएटपेक्षा स्वस्त ऑफर्स आणि डिस्काउंट्सकडेच तिचे जास्त लक्ष असायचे.

ऑफर्सच्या मोहामुळे वाढायचे खाणे

साराने सांगितले की, एका पिझ्झा आउटलेटवर एक पिझ्झा घ्या आणि दुसरा 50 टक्के सवलतीत मिळवा अशी ऑफर असायची. त्यामुळे गरज नसतानाही ती जास्त पिझ्झा ऑर्डर करायची. ती मजेत म्हणाली, त्या वेळी मी नीट गणित लावत नव्हते. तिच्या या वक्तव्यावर चाहत्यांनीही मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

साराने तिच्या सकाळच्या रुटीनबद्दलही खुलासा केला. ती दररोज क्लासला जाताना तीन चॉकलेट चिप ब्राउनी खायची. क्लासपर्यंत चालत जाण्यास फक्त काही मिनिटे लागायची पण त्या वेळेत ती तिन्ही ब्राउनी संपवायची. त्या काळात आपण किती आणि काय खात आहोत, याकडे अजिबात लक्ष नव्हते असेही अभिनेत्रीने सांगितले.

‘केदारनाथ’पूर्वी केला जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन

सारा अली खानने दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत केदारनाथ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र या चित्रपटापूर्वी तिने स्वतःमध्ये मोठा बदल घडवून आणला. वर्कआउट, नियंत्रित आहार आणि शिस्तबद्ध लाइफस्टाइलच्या मदतीने साराने तब्बल 45 किलो वजन कमी केले होते. तिच्या या ट्रान्सफॉर्मेशनने अनेकांना प्रेरणा दिली होती.

PCOS मुळे वाढले वजन

2019 मध्ये Harper’s Bazaar India ला दिलेल्या मुलाखतीत साराने तिच्या फिटनेस प्रवासाबद्दल सविस्तर सांगितले होते. तिने खुलासा केला की, तिला PCOS हा आजार होता, ज्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणे तिच्यासाठी कठीण झाले होते. तिने सांगितले की, स्वतःला अभिनेत्री म्हणून सिद्ध करण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी तिने कठोर मेहनत घेतली.

Follow Us
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणी
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणीने राजकीय वर्तुळात खळबळ!
एकच खळबळ! मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; थेट पोलिसांवर
एकच खळबळ! मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; थेट पोलिसांवरच उगारला चाकू, पुढे...
आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं
आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं फडणवीसांबाबत मोठं विधान, थेट...
पावसाने दिला दगा! 50 हजार खर्च करूनही परळीत सोयाबीनने टाकल्या माना
Beed | पावसाने दिला दगा! 50 हजार खर्च करूनही परळीत सोयाबीनने टाकल्या माना; शेतकरी हवालदिल
बुलढाण्याने पांघरला हिरवा शालू! पर्वतरांगांचं मनमोहक रूप पहाच
Buldhana | बुलढाण्याने पांघरला हिरवा शालू! सह्याद्री-अजिंठा पर्वतरांगांचं मनमोहक रूप पहाच
शरद पवारांचे फोटो पुन्हा राष्ट्रवादीच्या बॅनरवर झळकणार? परवानगी
NCP Banner | शरद पवारांचे फोटो पुन्हा राष्ट्रवादीच्या बॅनरवर झळकणार? परवानगी अन्... राजकीय चर्चांना उधाण
आधी मकोका, मगच अंत्यसंस्कार! युवकाच्या मृत्यूनंतर श्रीरामपूरमध्ये....
Shrirampur Crime Case | आधी मकोका, मगच अंत्यसंस्कार! युवकाच्या मृत्यूनंतर श्रीरामपूरमध्ये मृतदेहासह पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन
मध्य रेल्वेचा खोळंबा! मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड; लोकलसह....
Asangaon to Vasind | मध्य रेल्वेचा खोळंबा! मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड; लोकलसह एक्स्प्रेस गाड्या अर्धा तास रांगेत
री-डेव्हलपमेंटचा बेफिकीर खेळ! भर रस्त्यात कोसळली इमारत; खिडकीतून...
Kalyan Collapsed Building | री-डेव्हलपमेंटचा बेफिकीर खेळ! भर रस्त्यात कोसळली इमारत; खिडकीतून उडी मारून...
मोठी बातमी! ठाकरेंच्या गटातील नगरसेविका शिंदे सेनेच्या वाटेवर? राजकीय
मोठी बातमी! ठाकरेंच्या गटातील नगरसेविका शिंदे सेनेच्या वाटेवर? राजकीय घडामोडींना वेग