AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sara Ali Khan | सारा अली खानच्या चेहऱ्यावर उगवली दाढी-मिशी; फोटो होतोय व्हायरल

अभिनेत्री सारा अली खान तिच्या गमतीशीर स्वभावासाठी ओळखली जाते. सोशल मीडियावरील तिच्या या फोटोने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. हा फोटो पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल.

Sara Ali Khan | सारा अली खानच्या चेहऱ्यावर उगवली दाढी-मिशी; फोटो होतोय व्हायरल
Sara Ali KhanImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 01, 2023 | 12:58 PM
Share

मुंबई : अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलगी आणि अभिनेत्री सारा अली खान तिच्या खोडकर स्वभावासाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर ती बरीच सक्रिय असते आणि चाहत्यांसोबत विविध फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. आता इन्स्टा स्टोरीमध्ये तिने नुकताच एक फोटो पोस्ट केला आहे. साराचा हा फोटो पाहून चाहत्यांनाही हसू अनावर झालं आहे. कारण या फोटोमध्ये तिच्या चेहऱ्यावर दाढी – मिशा उगवल्याचं पहायला मिळत आहे. स्विमिंग पूलजवळ बसलेल्या साराचा हा फोटो खरंच हास्यास्पद आहे. पण हा तिचा कोणत्याही चित्रपटातील लूक नाही. तर साराने तिचा हा एडिट केलेला फोटो वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पोस्ट केला आहे.

‘यात फोटोग्राफरला शोधा.. माझ्यातील स्त्री-भावनेला सुंदररित्या पडद्यासमोर आणण्यासाठी धन्यवाद होमी अदजानिया. जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा’, असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. या फोटोमध्ये साराच्या मागे असलेल्या काचेवर होमीचं प्रतिबिंब पहायला मिळत आहे. साराने इन्स्टा स्टोरीमध्ये एक छोटा व्हिडीओसुद्धा शेअर केला आहे. यामध्ये ती होमीसोबत पुश-अप्स करताना दिसतेय.

दिग्दर्शक होमी अदजानियाच्या आगामी ‘मर्डर मुबारक’ या चित्रपटात सारा मुख्य भूमिका साकारणार असल्याचं कळतंय. तर अभिनेत्री करिश्मा कपूरचीही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. याशिवाय साराने लक्ष्मण उतेकर यांच्याही एका चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलंय. यामध्ये तिच्यासोबत विकी कौशलची मुख्य भूमिका आहे. जगन शक्ती यांच्याही एका चित्रपटात ती काम करणार आहे.

सारासोबतच बॉलिवूडमधल्या इतर सेलिब्रिटींनीही होमीला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत. होमीने आतापर्यंत कॉकटेल, फाईंडिंग फॅनी आणि अंग्रेजी मीडियम यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. त्याने स्टायलिस्ट आणि कॉस्च्युम डिझायनर अनैता श्रॉफ अदजानियाशी लग्न केलंय.

गेल्या काही दिवसांपासून सारा तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आली आहे. ती क्रिकेटर शुभमन गिलला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. याआधी तिचं नाव दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतशी जोडलं गेलं होतं. त्यानंतर 2018 मध्ये जेव्हा साराने ‘कॉफी विथ करण’मध्ये हजेरी लावली होती, तेव्हा तिने कार्तिक आर्यनवर क्रश असल्याचा खुलासा केला होता. ‘लव्ह आज कल’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान या दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. 2020 मध्ये कार्तिक आणि साराचं ब्रेकअप झालं.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.