मला वाटलं तिचा मृत्यू होईल…, बायकोच्या निधनाबद्दल शाहरुख खानचं हैराण करणारं वक्तव्य
Shah Rukh Khan: बायको गौरीच्या निधनाबद्दल असं का म्हणालेला शाहरुख खान, 'मला वाटलं तिचा मृत्यू होईल...', कारण जाणून व्हाल हैराण, किंग खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असतो चर्चेत...

Shah Rukh Khan: अभिनेता शाहरुख खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. शाहरुख खान कायम त्याच्या कुटुंबियांबद्दल देखील सांगत असतो. शाहरुख खान असा अभिनेता आहे ज्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच गौरी हिच्यासोबत लग्न केलं. गौरी आणि शाहरुख यांची लव्हस्टोरी आज प्रत्येकाला माहिती आहे. गौरी आणि शाहरुख यांनी 1991 मध्ये लग्न केलं आणि 1992 मध्ये शाहरुख खान याने ‘दिवाना’ सिनेमातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. तर लग्नाच्या 6 वर्षांनंतर गौरी हिने पहिल्या बाळाला जन्म दिला.
1997 मध्ये गौरी आणि शाहरुख खान यांनी मुलगा आर्यन खान याचं जगात स्वागत केलं. पण जेव्हा गौरी मुलगा आर्यन याला जन्म देत होती तेव्हा शाहरुख खान प्रचंड घाबरलेला होती. गौरीचं निधन होईल असं देखील किंग खान म्हणाला होता. किंग खान असं का म्हणाला होता जाणून घेऊ…
आई – वडिलांचा रुग्णालयात मृत्यू
शाहरुख खान याने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीचं अभिनेत्याच्या आई – वडिलांचं निधन झालं होतं. 1998 मध्ये दिलेल्या मुलाखतीत किंग खान म्हणाला होता की, त्याला रुग्णालयात जायला आवडक नाही. कारण शाहरुखने आई – वडिलांना रुग्णालयात गमावलं होतं. पुढे गौरीच्या डिलिव्हरीबद्दल अभिनेता म्हणाला, मी कधीच गौरीला आजारी पडताना पाहिलं नाही. पण डिलिव्हरी दरम्यान गौरीची प्रकृती खालावली होती. डॉक्टरांनी गौरीला ट्यूब आणि बाकी गोष्टी लावल्या होत्या.
मला वाटलं तिचा मृत्यू होईल – शाहरुख खान
अभिनेत्याने पुढे सांगितले की जेव्हा गौरीला सिझेरियनसाठी ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले तेव्हा मीही तिथे होतो. त्यावेळी मी बाळाच्या जन्माबद्दल विचार करत नव्हतो, मला वाटलं होतं की गौरी मरेल. गौरी थरथर कापत होती. पण काहीही झालं नाही. 12 नोव्हेंबर 1997 मध्ये गौरीने आर्यन याला जन्म दिला.
View this post on Instagram
तीन मुलांचे आई – वडील आहेत गौरी – शाहरुख खान
आर्यनच्या जन्मानंतर गौरी आणि शाहरुख मुलगी सुहाना हिचं जगात स्वागत केलं. गौरी हिने लेक सुहाना हिला 22 मे 2000 रोजी जन्म दिला. एक मुलगा आणि एक मुलगी झाल्यानंतर, या जोडप्याने पुन्हा पालक होण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण, त्यांच्या वाढत्या वयामुळे, 2013 मध्ये सरोगसीद्वारे ते लहान मुलगा अबरामचे आई – वडील झाले.
